सुवर्ण मंदीर प्रकरणातील दोषींना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या ; नवज्योत सिंग सिद्धू यांची मागणी


पंजाबमध्ये घडलेल्या त्या घटनेनंतर अनेक नेत्यांनी गुरूद्वाऱ्याची पवित्रा भंग केल्याचा निषेध केला होता.Hang the culprits in the Golden Temple case in public places; Demand of Navjot Singh Sidhu


विशेष प्रतिनिधी

चंदीगड : अमृतसर मधील सुवर्ण मंदिरात शनिवारी गुरु ग्रंथ साहीबचा अवमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली.पंजाबमध्ये घडलेल्या त्या घटनेनंतर अनेक नेत्यांनी गुरूद्वाऱ्याची पवित्रा भंग केल्याचा निषेध केला होता.

या घटनेच्या निषेधार्थ पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी सुवर्ण मंदीर प्रकरणातील दोषींना सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याची मागणी केली आहे.रविवारी मालेरकोटलामध्ये एका सभेला संबोधित करताना सिद्धू म्हणाले की, ‘सुवर्ण मंदीरात झालेल्या घटनेमुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणातील सर्व दोषींना सार्वजनिरीत्या फाशी देण्यात यावी.’



मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनीही कथित पवित्रता भंग केल्याचा निषेध केला होता. मात्र लिंचिंगवर मौन बाळगलं आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, सर्व नागरिकांनी धार्मिक स्थळांची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं होतं.

Hang the culprits in the Golden Temple case in public places; Demand of Navjot Singh Sidhu

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात