वादग्रस्त : डाबरने केली लेस्बियन करवा चौथची जाहिरात, नेटकऱ्यांच्या संतापानंतर मागितली जाहीर माफी


करवा चौथनिमित्त डाबर फेम ब्लीचच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली. या जाहिरातीत एक समलैंगिक जोडपे (लेस्बियन) करवा चौथ साजरा करताना दाखवले आहेत. मात्र, या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर दोन गट झाले आहेत.Dabur FEM apologies For Controversial Lesbian Couple Shown Making Fun Of Karwachauth Advt


प्रतिनिधी

मुंबई : करवा चौथनिमित्त डाबर फेम ब्लीचच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली. या जाहिरातीत एक समलैंगिक जोडपे (लेस्बियन) करवा चौथ साजरा करताना दाखवले आहेत.

मात्र, या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर दोन गट झाले आहेत. एकीकडे एलजीबीटीक्यू समुदायाकडून या जाहिरातीला खूप पसंती दिली जात आहे, तर दुसरीकडे हिंदू सणांची पुन्हा एकदा चेष्टा असे वर्णन केले जात आहे.

जाहिरातीवर वाढत असलेला वाद पाहून डाबरने खेद व्यक्त केला आहे आणि सोशल मीडियाद्वारे लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफीही मागितली आहे.

https://twitter.com/JayJPatel_/status/1452602036978176005?s=20

दरम्यान, या प्रकरणावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, “जाहिराती आणि व्हिडिओ-फोटो फक्त हिंदू धर्माच्या धार्मिक सणांसाठीच का जारी केले जातात. आज गे किंवा लेस्बियनचे व्रत दाखवत आहेत आणि उद्या पुन्हा मुलांचे (गे) लग्न करताना दाखवतील. जर तुमच्यात हिंमत आहे,

तर मग इतर धर्मांबद्दल दाखवा. मी डीजीपींना सूचना दिल्या आहेत, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा आणि कंपनीला सांगा. कंपनीने एकतर जाहिरात काढून टाकावी किंवा आम्ही कारवाई करू.”

Dabur FEM apologies For Controversial Lesbian Couple Shown Making Fun Of Karwachauth Advt

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात