आमीर खानसारखेच लोक लोकसंख्या वाढविण्यास कारणीभूत, भाजपा खासदार सुधीर गुप्ता यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

मंदसौर: आमीर खान यांना पहिली पत्नी रीना दत्तापासून २ मुलं आहेत. दुसरी किरण राव मुलांसह कुठे भटकेल याची चिंता नाही. पण आजोबा आमीर तिसरीच्या शोधात आहेत. हा एका अभिनेत्याचा संदेश आहे .? असा सवाल मंदसोरचे भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांनी केला आहे.BJP MP Sudhir Gupta alleges that people like Aamir Khan are responsible for population growth

जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी सरकारने नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण आणले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही लोकसंख्या नियंत्रण धोरणावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे म्हटले अहे.



या पार्श्वभूमीवर गुप्ता म्हणाले, देशाची लोकसंख्या नियंत्रणाबाहेर जाण्यास आमीर खानसारख्या लोकांचा हात आहे. हे देशाचे दुर्दैव आहे.२०२१-३० पर्यंत उत्तर प्रदेशात नवे लोकसंख्या धोरण लागू राहील. गरीबी आणि निरक्षरतेला वाढती लोकसंख्या कारणीभूत आहे. काही समाजांमध्ये लोकसंख्येबाबत जागरूकतेचा अभाव आहे.

यामुळे जनजागृती करण्याची गरज आहे. नवीन लोकसंख्या धोरण २०३० पर्यंत लागू राहील. समाजांमध्ये लोकसंख्येचं संतुलन कायम ठेवण्यासाठी केंद्रीय प्रयत्नांची गरज असल्याचंही योगी सरकारने म्हटलं आहे.

BJP MP Sudhir Gupta alleges that people like Aamir Khan are responsible for population growth

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!