हिंदूंवर झालेले हल्ले हा बांगलादेशातअल्पसंख्याकांना संपविण्यासाठीचा कट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टीका


विशेष प्रतिनिधी

धारवाड : बांगलादेशमध्ये दुगार्पूजा उत्सावादरम्यान हिंदूंवर झालेले हल्ले हा अल्पसंख्याकांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रचलेला कट होता, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. हे हल्ले थांबविण्याबाबत पावले उचलावीत, असे केंद्र सरकारने शेजारी देशाला सांगण्याचे आवाहन संघाने केले आहे.Attacks on Hindus are a plot to eliminate minorities in, criticizes Rashtriya Swayamsevak Sangh

आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीत याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. त्याची माहिती संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार यांनी दिली. ते म्हणाले, अल्पसंख्याकांवरील हल्ले करणाऱ्यांवर बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी संघाने केली आहे. हल्ल्याचा उद्देश धार्मिक संघर्ष निर्माण करणे हा होता. या मुद्यावर संयुक्त राष्ट्र व इतर मानवाधिकार संघटनांनी मौन बाळगले आहे. यातून त्यांची दुटप्पी भूमिका दिसून येते.



दुगार्पूजा साजरी केली जात असतानाच बांगलादेशात हिंदू मंदिरांवर समाजकटकांनी हल्ले केले. त्यानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये तीन जण मारले गेले. अनेक हिंदूची घरे लुटण्यात आणि जाळण्यात आली. २२ जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

हिंसाचारात ६० जण जखमी झाले आहेत. ढाक्यापासून सुमारे १०० किलोमीटरवर असणाऱ्या कमिला येथे दंगलींना सुरुवात झाली होती. कथित ईशनिंदा झाल्याच्या आरोपावरून या दंगली सुरू झाल्या. दंगली सुरू होताच प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Attacks on Hindus are a plot to eliminate minorities in Bangladesh, criticizes Rashtriya Swayamsevak Sangh

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात