शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम


पक्षप्रवेश कार्यक्रमाला आपले सुमारे २ हजार समर्थक उपस्थित असल्याचा दावा राजापुरे यांनी केला.Shiv Sena’s four pieces in NCP, correct program was held in Konkan


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दोन दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, खेडचे तालुकाप्रमुख दत्ताराम गोठल आणि युवासेना दापोली उपतालुका अधिकारी विकास जाधव यांनी आज शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर ते बोलत होते. पक्षप्रवेश कार्यक्रमाला आपले सुमारे २ हजार समर्थक उपस्थित असल्याचा दावा राजापुरे यांनी केला.

त्यांनी चौघांचे पक्षात स्वागत केले व त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी बळ मिळाले असल्याचे सांगितले. कुणबी सेवा संघाच्या सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी सभागृह तुडुंब भरले होते. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना उभे राहून हा कार्यक्रम पाहावा लागला. राजपुरे म्हणाले, ‘गेली तब्बल २५ वर्षे मी शिवसेनेचे काम केले.९ वर्षे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून काम केले आहे; तर शंकर कांगणे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून सेनेचे काम करत आहेत. मुलुंड येथील कुणबी समाजोन्नती संघाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने निधी द्यावा, या मागणीसाठी आम्ही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली व निधीची मागणी केल्यावर अर्थसंकल्पात ५ कोटींची, तसेच शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासन आदेशातील एका वाक्याचा वेगळा अर्थ काढून ५ कोटी रुपये शासन परत घेणार, अशा स्वरूपाची पत्रके वाटून विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्यात आला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक नवा रुपयाही शासन परत घेणार नाही, अशी ग्वाही दिली आहे, असे राजपुरे यांनी सांगितले.

Shiv Sena’s four pieces in NCP, correct program was held in Konkan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण