छगन भुजबळ, तुम्ही नांदगावचा नाद सोडा; संजय राऊतांचा टोला; सुहास कांदेंची थोपटली पाठ


प्रतिनिधी

नाशिक : छगन भुजबळ तुम्ही नांदगावचा नाद सोडा. शिवसेना आहे म्हणूनच तुम्ही नाशिकचे पालकमंत्री आहात. आम्ही सरकार स्थापन केले नसते तुम्ही पालकमंत्री कसे झाला असतात? तेव्हा कोणावर अन्याय करू नका. सगळ्यांना समान न्याय – निधी द्या, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नांदगाव मध्ये लगावला. छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या राजकीय वादावर संजय राऊत यांनी बॅटिंग करून घेतलीsanjay raut’s adviced chhagan bhujbal to forget and vacate nanadgaon seat forever

‘तुम्ही आमचा पाहुणचार चांगला केला. एकदा छगन भुजबळांनाही पाहुणचारासाठी बोलवा’, असा मिश्किल सल्लाही संजय राऊत यांनी सुहास कांदे यांना दिला.

संजय राऊत म्हणाले, की भुजबळांना आम्ही सांगू, आता नांदगावचा नाद सोडा. इकडे फार लक्ष घालू नका. आज नाशिकला लाल दिवा आला, उद्या नांदगावला आणू.


“शिवसैनिक मुख्यमंत्री” वादाला छगन भुजबळांची राजकीय फोडणी!!;म्हणाले, बाळासाहेब, पवार आणि काँग्रेसही मलाच मुख्यमंत्री करणार होते, पण…


नांदगावमध्ये गुप्ता लॉन्स येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कांदे यांनी भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका केली. त्यानंतर राऊत यांनीही खोचकपणे भुजबळ यांच्यावर ‘वाग्बाण’ सोडले. ‘मी शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो’ या भुजबळ यांच्या विधानाचा समाचार घेताना राऊत यांनी ‘शिवसेनेत होतात या पुण्याईवर आज तुम्ही टिकून आहात’ असे भुजबळ यांना सुनावले. आम्ही सरकार स्थापन केले नसते तर तुम्ही पालकमंत्री कसे झाला असतात?, अन्याय करायला? असा सवालही त्यांनी केला. मात्र कांदे तुमच्याकडे जिल्हा नियोजन समितीचे पद कधीतरी येईल. निधीही तुमच्या ताब्यात येईल. तेव्हा तुम्ही कोणावर अन्याय करू नका, असा सल्लाही राऊत यांनी कांदे यांना दिला. तुम्ही अन्यायाविरुद्ध लढलात. बाळासाहेब आज असते तर तुमची पाठ थोपटली असती, असे प्रशस्तीपत्रही राऊत यांनी कांदेंना दिले. मात्र, भुजबळ महाविकास आघाडीचे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आदरणीय आहेत, हे सांगायलाही राऊत विसरले नाहीत.

कांदे यांनी भुजबळांना लक्ष्य करीत त्यांच्या मुलाला निवडणुकीत पाडले म्हणून त्यांनी नांदगावला अपुरा निधी दिल्याचा आरोप केला. येवल्याला ८० कोटी आणि चांदवडमध्ये भाजप असतानाही ४० कोटी दिले. सर्वात जास्त पाऊस, महापूर येऊनही नांदगावला फक्त दोन कोटी मिळाले. हा अन्याय असल्याचे कांदे म्हणाले. आम्हाला निधी मिळाला नाही तर आख्खी ‘डीपीडीसी’ उचलून आणू, असा इशाराही त्यांनी दिला. राऊत यांच्या हस्ते मनमाड व नांदगाव येथे ऑक्सिजन प्लँन्टचा शुभारंभ तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन झाले.

– पाणी प्रश्न सोडवण्याची ग्वाही

मनमाडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी स्वतः प्रयत्न करण्याची ग्वाही राऊत यांनी दिली. मनमाडचा पाणीप्रश्न महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असून, हे सरकार मनमाड व नांदगावला पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले. नांदगावमध्ये पूर येऊन गेलेला असताना वीज कंपनी शेतकऱ्यांची वीज तोडत असेल तर सरकारमध्ये असाल तरीही शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करू, असेही त्यांनी सुनावले.

sanjay raut’s adviced chhagan bhujbal to forget and vacate nanadgaon seat forever

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात