“शिवसैनिक मुख्यमंत्री” वादाला छगन भुजबळांची राजकीय फोडणी!!;म्हणाले, बाळासाहेब, पवार आणि काँग्रेसही मलाच मुख्यमंत्री करणार होते, पण…


प्रतिनिधी

नाशिक – शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे वचन बाळासाहेबांना दिले होते, या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विधानावरून महाराष्ट्रात राजकारण रंगलेले असताना माजी शिवसैनिक आणि सध्याचे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट बाळासाहेबांची आठवण काढत राजकीय फोडणी दिली आहे.chagan bhujbal claims to be the chief minister of maharashtra

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन हे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिले होत. ते वचन अजून पूर्ण झालेले नाही. पण मी पुत्रकर्तव्य म्हणून मुख्यमंत्री झालो, असे वक्तव्य काल उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मग सुभाष देसाई, दिवाकर रावते किंवा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे होते ना, असा चिमटा काढला. यावर महाराष्ट्रात जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.



या चर्चेला छगन भुजबळ यांनी नवे विधान करून राजकीय फोडणी दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले, की माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजिबात नाही. अनेक मुख्यमंत्री पायउतार झाल्यानंतर त्यांना दोन माणसेही भेटत नाहीत. बाळासाहेबच म्हणायचे भुजबळ गेले नसते तर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते. मी त्यावेळी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. त्यावेळी मी शिवसेना-भाजप सरकारवर तुटून पडलो होतो. तेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला होता. काही केसेसही टाकल्या होत्या. त्यात काही खरे नव्हतं. त्यावेळी मी निधड्या छातीने लढत होतो. त्यावेळी काँग्रेसचे विभाजन झाले नव्हते. तेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना विचारले होते, तुमचे सरकार आले तर मुख्यमंत्री कोण असणार तेव्हा पवार म्हणाले, आणखी कोण असणार भुजबळच असणार,’ अशी आठवण भुजबळांनी सांगितली.

पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. मीही पवारांसोबत गेलो. तेव्हा शीला दीक्षित, माधवराव शिंदे, राजेश पायलट, सुरेश कलमाडी, मुकुल वासनिक, जॉर्ज आदींचे मला फोन केले. तुम्ही काँग्रेसमध्ये या. तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो. पण मी त्यांना नाही म्हटले. मी शिवसेना सोडली. ओबीसीच्या राजकारणामुळे. पवारांचा हात धरला. पवारांनी आमच्या भावना पूर्ण केल्या. मी आहे त्यात खूश आहे. मी काही येणार नाही, असं मी त्यांना सांगितले, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला.

chagan bhujbal claims to be the chief minister of maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात