मंदिर-मंडपांवर हल्ल्यातील सहभागींना सोडले जाणार नाही, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिपादन

Those involved in the attack on temples-pandals will not be spared, said Bangladesh PM Sheikh Hasina

Bangladesh PM Sheikh Hasina : बांग्लादेशमध्ये दुर्गा पूजेच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर तीव्र टीका झाली. यानंतर जे कोणी या हल्ल्यात सामील आहेत त्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा शेख हसीना यांनी दिला आहे. शेख हसीना म्हणाल्या की, ते कोणत्या धर्माचे आहेत याने काही फरक पडत नाही. धार्मिक दंगली थांबवण्यासाठी योग्य ती शिक्षा दिली जाईल. Those involved in the attack on temples-pandals will not be spared, said Bangladesh PM Sheikh Hasina


वृत्तसंस्था

ढाका : बांग्लादेशमध्ये दुर्गा पूजेच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर तीव्र टीका झाली. यानंतर जे कोणी या हल्ल्यात सामील आहेत त्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा शेख हसीना यांनी दिला आहे. शेख हसीना म्हणाल्या की, ते कोणत्या धर्माचे आहेत याने काही फरक पडत नाही. धार्मिक दंगली थांबवण्यासाठी योग्य ती शिक्षा दिली जाईल.

ढाका येथील ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिरातील कार्यक्रमाला शेख हसीना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, कोमिला जिल्ह्यातील घटनेची चौकशी केली जात आहे. ज्यांनी हिंदू मंदिरे आणि दुर्गापूजा मंडपांवर हल्ला केला, त्यापैकी कोणालाही सोडले जाणार नाही. या समाजकंटकांचा धर्म काय होता हे महत्त्वाचे नाही. या हल्ल्यांमागे असे लोक आहेत, जे इतरांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरले आहेत.

सोशल मीडिया पोस्टनंतर हिंसा भडकली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुक पोस्टमध्ये कुराणचा कथित अपमान केल्यामुळे हिंसाचार उसळला आणि अनेक दुर्गापूजा मंडपांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली. बांगलादेशच्या कोमिला जिल्ह्यातील एका पूजा पंडालमध्ये कुराणचा अपमान केल्याच्या अफवांशी संबंधित सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या भागात हिंसाचार उसळला.

यानंतर चांदपूरमधील हबीबगंज, चटगांवमधील बांसखाली, कॉक्स बाजारातील पेकुआ आणि शिवगंजमधील चापैनवाबगंज यासह अनेक भागांत हिंसाचार भडकला आणि मंडपांची तोडफोड झाली. या हिंसाचारात तीन लोकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. बांगलादेश हिंदू एकता परिषदेनेही या प्रकरणी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले होते की, ’13 ऑक्टोबर 2021 हा बांगलादेशच्या इतिहासातील निंदनीय दिवस होता. अष्टमीच्या दिवशी मूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने अनेक पूजा मंडपांची तोडफोड करण्यात आली. हिंदू आता पूजा मंडपांचे रक्षण करत आहेत. आज संपूर्ण जग शांत आहे. जगातील सर्व हिंदूंवर मा दुर्गाचे आशीर्वाद राहो.”

Those involved in the attack on temples-pandals will not be spared, said Bangladesh PM Sheikh Hasina

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात