एअरपोर्टवर जाणीवपूर्वक कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं जातंय,असाही आरोप करत प्रवाशांनी गोंधळ घातला. 125 more corona sufferers on chartered flight from Italy to Amritsar infected with corona
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगानं वाढ होऊ लागलीय.दरम्यान, अनेकजण ओमायक्रॉनच्या जाळ्यातही अडकत चालले आहेत.भारतात गुरुवारी ओमायक्रॉनचे सर्वाधिक 495 नवे रुग्ण आढळून आले होते. ज्यामुळं देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची एकूण संख्या 2 हजार 630 वर पोहचलीय.
निवडणुकीपूर्वी नववर्ष साजरे करण्यासाठी राहुल गांधी इटलीला रवाना, पंजाबची नियोजित सभा रद्द, काँग्रेसचे दिले हे स्पष्टीकरण
यातच आता इटलीहून अमृतसरमध्ये आलेल्या चार्टर्ड विमानातून एकूण 179 प्रवासी अमृतसरमध्ये दाखल झाले होते.दरम्यान या विमानामधील 125 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आलीय.याबाबत एअरपोर्ट डायरेक्टर वीके सेठनं याबाबत माहिती दिलीय.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सगळे प्रवासी पंजाबचेच आहेत.दरम्यान एअरपोर्टवर जाणीवपूर्वक कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं जातंय,असाही आरोप करत प्रवाशांनी गोंधळ घातला.दरम्यान प्रवाशांनी कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या आहेत आणि 72 तासांपूर्वीच कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही प्रवाशांचं म्हणणं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App