पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी ; काँग्रेसकडून ट्विटरवर खिल्ली; “राजकारण नकोची” पत्रकार परिषदेत मखलाशी!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्यात सुरक्षाविषयक त्रुटींवर ठेवण्यात आली. तिचे उल्लंघन झाले. या मुद्द्यावर देशभरात राजकीय गदारोळ उठला असताना काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर कालपासून पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्याची खिल्ली उडवली आहे.Congress on PM Modi’s security

पण आज पत्रकार परिषदेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या वतीने वेगळ्या प्रकारची मखलाशी केली आहे. पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था ही सर्वांची जबाबदारी आहे हा विषय गंभीर आहे. अशा स्वरुपाचे वक्तव्य अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत केले आहे.



अशोक गेहलोत म्हणाले, काँग्रेस पक्ष पंतप्रधानांना सांगू इच्छितो की त्यांची सुरक्षा व्यवस्था ही देशातील सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. त्यावरून राजकारण होणे अयोग्य आहे. पंतप्रधानांनी काल जे वक्तव्य केले की तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा मी जिवंत परत येऊ शकलो याबद्दल धन्यवाद!!, हे वक्तव्य पंतप्रधानांनी करायला नको होते, असे अशोक गेहलोत म्हणाले.

अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या वतीने आज पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी राजकारण व्हायला नको असे म्हणत असले तरी काँग्रेसची काल दिवसभरातील अधिकृत ट्विटर हँडल वरील विविध ट्विट्स बघितली तर अनेकदा काँग्रेसने पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था या विषयाची खिल्ली उडविलेली दिसेल.

पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव माघारी फिरले असे नसून त्यांच्या फिरोजपूर मधील रॅलीमध्ये 70000 खुर्च्या मांडल्या होत्या पण प्रत्यक्षात 700 लोक आले अशी टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर राहुल गांधींना उत्तर प्रदेशात पोलीस अडवत आहेत आणि पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर कडक सुरक्षा व्यवस्थेत आहे,

असे तुलनात्मक ट्विटही काँग्रेसने केले आहे. काल दिवसभर काँग्रेसने किमान आठ ते दहा ट्विटस् पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था या विषयाची खिल्ली उडवणारी केली आहेत आणि आज मात्र अशोक गेहलोत हे या विषयावरून राजकारण नको असे म्हणत आहेत.

कालच्या सर्व घटनाक्रमाची गंभीर दखल राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट, पंजाबचे राज्यपाल यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब मध्ये काही गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत आणि त्यामुळेच अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्यावतीने वेगवेगळी मखलाशी केल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर पंजाब मधले शेतकरी आंदोलनातले नेतेदेखील पंजाब सरकारचा बचाव करताना दिसताहेत.

Congress on PM Modi’s security

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात