गडचिरोली : आष्टी येथील लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम शाळेत २४ विद्यार्थी आढळले कोरॉना बाधित


131 विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली. यातील 24 विद्यार्थी बाधित आढळले.हे सर्व विद्यार्थी इयत्ता सातवी ते अकरावीचे असल्याची माहिती मिळाली आहे.Gadchiroli: 24 students found at Little Heart English Medium School in Ashti


विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा सुरू झाला आहे.महाराष्ट्रात बुधवारी 26 हजार 538 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 65 लाख 24 हजार 247 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथीललिटल हार्ट इंग्लिश मिडीयम शाळेतले 24 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.हे सर्व विद्यार्थी इयत्ता सातवी ते अकरावीचे असल्याची माहिती मिळाली आहे.या शाळेत नववर्ष दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित झाला होता.या कार्यक्रमात बाहेरून देखील लोक सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर शाळेतील काही मुलांना ताप जाणवू लागल्यावर 131 विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली.

यातील 24 विद्यार्थी बाधित आढळले.दरम्यान आष्टी येथील शासकीय रुग्णालयात मुलांची अँटिजेन चाचणी करून सर्वांना गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Gadchiroli: 24 students found at Little Heart English Medium School in Ashti

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था