पुणे : सराईत चंदन चोर पोलिसांच्या ताब्यात ; १०२ किलो चंदन जप्त


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यात पेरणेफाटा परिसरात आलेल्या एका सराईत चोरट्याला खंडणी विरोधी पथकाने पाठलाग करुन पकडले.चोरट्याकडून ४ लाख रुपयांचे १०२ किलो चंदन जप्त केले आहे.तसेच चांदणासोबत गाडी असा ५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.लक्ष्मण भीमा गायकवाड (वय ४२, रा. तरडोबाची वाडी, ता. शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. chandan wood thief in police custody

लोणीकंद, वाघोली, विमानगर या परिसरात खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली, की चंदन तस्करी करणारे चंदन विक्री करण्यासाठी नगर रोड परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांच्या पथकाला पेरणे फाटा परिसरातून एक कार भरधाव येताना दिसली.


पुण्यामधील उद्यानाला प्रभू श्री रामचंद्राचे नाव, महापालिकेचा निर्णय; शहराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन


पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कार पुढे गेली. त्यामुळे पोलिसांनी कारचा पाठलाग करुन तिला वाळके वस्ती परिसरात पकडले .दरम्यान कारमध्ये १०२ किलो चंदन मिळून आले. तसेच, ती कारदेखील जप्त करण्यात आली आहे.गायकवाड याच्याकडे मिळालेले चंदन त्याला काही जणांनी विक्री केल्याचे सांगत आहे. त्यामुळे तो चंदन विकत घेणारा असण्याची शक्यता आहे.

chandan wood thief in police custody

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात