मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदी विजेंद्र सिंह यांची नियुक्ती


  • समीर वानखेडे यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ते कस्टम डिपार्टमेंटमध्ये रुजू होणार आहेत. Appointment of Vijendra Singh as Divisional Director Mumbai NCB

विशेष प्रतिनिधी

मुंबई : समीर वानखेडे यांचा झोनल डायरेक्टर म्हणून एनसीबीतील कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती .परंतु समीर वानखेडे यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ते कस्टम डिपार्टमेंटमध्ये रुजू होणार आहेत.दरम्यान मुंबई अमली पदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची दिल्लीत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी महसूल विभागाचे (आयआरएस ) अधिकारी विजेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याकडे विभागीय संचालक पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांनी त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील अमली पदार्थ तस्करांवर कारवाई केली होती. क्रुझवरील ड्रग्स कारवाईदरम्यान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा सापडल्यामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते.

Appointment of Vijendra Singh as Divisional Director Mumbai NCB

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था