राम मंदिरातल्या चोरी बद्दल कांगावा करणारे काँग्रेस आणि समाजवादी नेते वफ्फची हजारो हेक्टर जमीन विकली गेली तेव्हा बोलले का??; योगी आदित्यनाथ यांचा परखड सवाल!!

वृत्तसंस्था

प्रतापगड : राम मंदिरातल्या चोरी बद्दल कांगावा करणारे काँग्रेसचे आणि समाजवादी पार्टीचे नेते वक्फच्या नावाखाली हजारो हेक्टर जमीन विकली गेली ती गरिबांची जमीन होती पण ती विकली गेल्याबद्दल कधी बोलले का??, असा परखड सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज जाहीरपणे केला. Yogi Adityanath

योगी आदित्यनाथ म्हणाले, “मला समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या लोकांना विचारायचे आहे: अयोध्येतील कथित चोरीच्या मुद्द्यावरून तुम्ही हिंदू श्रद्धेची जी थट्टा करता आहात, त्याबद्दल बोलताना मला सांगा – राज्यभरात आणि देशभरात वक्फच्या नावाने हजारो हेक्टर जमीन विकली गेली, तेव्हा तुम्ही एकदाही त्याबद्दल आवाज उठवला होता का?? ही जमीन समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांची होती. ही अशी जमीन होती जी गरिबांना भाडेपट्ट्यावर (लीजवर) देता आली असती; जिथे कन्व्हेन्शन सेंटर्स उभारता आली असती; जिथे गरीब व्यापाऱ्यांसाठी दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने निर्माण करता आली असती.”

– राम मंदिरातील चोरी बद्दल कारवाई

“श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने उत्तर प्रदेश सरकारकडे एसआयटी (SIT) स्थापन करण्याची विनंती केली होती आणि मी आश्वासन दिले होते की एसआयटी संपूर्ण सत्य बाहेर आणेल. त्यानंतर, ज्यांच्याविरुद्ध पुरावे उपलब्ध होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

– वक्फच्या मुद्द्यावर गप्प का??

योगी आदित्यनाथ म्हणाले, पण मी विचारतो, वक्फच्या मुद्द्यावर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या लोकांची तोंडे ‘फेविकॉल’ने बंद केल्यासारखी का वाटतात? जेव्हा त्यांनी धार्मिक स्थळांसाठी हिंदूंनी दिलेल्या देणगीचा निधी कब्रस्तानच्या संरक्षक भिंती बांधण्यासाठी वापरला, तेव्हा हिंदू श्रद्धेला धक्का लागला नाही का?? जेव्हा त्यांनी बेकायदेशीर कत्तलखाने चालवले, गोमातांची हत्या करण्यासाठी चिथावणी दिली आणि तस्करांच्या हातून तिला चिरडले जाऊ दिले, तेव्हा हिंदू श्रद्धेला धक्का लागला नाही का?? जेव्हा त्यांनी अयोध्येत रामभक्तांवर गोळ्या झाडल्या आणि लाठीचार्ज केला, तेव्हा हिंदू श्रद्धेला धक्का लागला नाही का?? मला समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला विचारायचे आहे: जेव्हा ते कावड यात्रेवर निर्बंध लादत असता, तेव्हा हिंदूंच्या भावना दुखावल्या जात नव्हत्या का?? श्री राम जन्मभूमी ट्रस्ट मंदिराचा कारभार पाहत आहे आणि त्यांच्यामध्ये कोणाचाही बाह्य हस्तक्षेप नाही. पण या समाजवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची सरड्याशी तुलना केली तर सरड्यालाही वाटेल कुठलीतरी नवीन प्रजाती आली आहे जी आपल्यापेक्षाही वेगाने रंग बदलते!!

Yogi Adityanath’s pointed question regarding the theft at the Ram Mandir.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात