विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – गेल्या चोवीस तासात देशभरात तब्बल १ लाख १७ हजार ९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीहून अमृतसरला आलेल्या दोन चार्टर्ड विमानात १७३ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.Two planes fulled with corona pataiants
दोन्ही विमानात मिळून २७६ हून अधिक प्रवासी होते. त्यांची रॅपिड ॲटीजेन चाचणी केली असता त्यात १७३ जणांना बाधा असल्याचे आढळून आले. अमृतसर विमानतळावर उतरलेल्या उर्वरित १०३ प्रवाशांचा चाचणी अहवाल येणे अद्याप बाकी आहे. काल देखील रोमहून आलेल्या चार्टर्ड फ्लाईटमधील १७९ पैकी १२५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
परदेशातून येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवसांचे गृहविलगीकरण अनिवार्य केले आहे. देशात वाढती रुग्णसंख्या पाहता सरकारने निर्णय घेतला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या पाहिली तर आतापर्यंत ३.५२ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
त्यापैकी ३.४३ कोटी बरे झाले असून ४.८३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या साडेतीन लाख लोकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App