विशेष प्रतिनिधी
पाटणा – बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील ओराई गावात ब्रह्मदेव मंडल (वय ८४) यांनी कोरोनावरील लशीचे तब्बल बारा डोस घेतल्याचा दावा केला आहे. एवढे डोस घेतल्याने गुडघेदुखी थांबल्याचे त्यांचे म्हणणे आहे.Old person toke 11 dose of corona vaccine
गुडघेदुखीने ते कायम त्रस्त असत. बारावा डोस घेण्यासाठी आलेल्या मंडल यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनीच ही माहिती दिली. ती ऐकून मधेपुराचे सरकारी वैद्यकीय अधिकारी सुद्धा आश्चर्यचकित झाले. पण त्यांच्या दाव्यानंतर या प्रकराची चौकशी करण्याचा आदेश डॉक्टरांनी दिला आहे.
एकाच आधार व मोबाईल क्रमांकावरून एखादा अकरा वेळा डोस कसा घेऊ शकतो, हे आश्च र्यकारक आहे. त्यामुळे या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.मंडल हे टपाल विभागातून निवृत्त झालेले आहेत.
विशेष म्हणजे त्यांनी जेव्हा-जेव्हा डोस घेतला आहे,त्याची तारीख त्यांनी डायरीत नोंदवून ठेवली आहे. १३ फेब्रुवारी २०२१मध्ये त्यांनी लशीचा पहिला डोस घेतला होता आणि शेवटचा यंदा ४ जानेवारीला घेतला आहे.
काही डोस एकाच केंद्रातून घेतले असून बाकी वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्याचे त्यांनी सांगितले. गुडघेदुखीने ते त्रस्त झालेले होते. कोरोनाप्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतल्यानंतर दुखणे कमी झाल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे आनंद होऊन त्यांनी एक-एक करीत बारा डोस घेतले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App