यश नशिबाने मिळत नाही व वैभव कधीच अपघाताने मिळत नाही. जे वैभवसंपन्न व यशस्वी झाले त्यांनी स्वतःला अधिक उत्पादनक्षम व प्रभावी बनवण्यासाठी काही सवयी लावून घेतल्या. These habits must be inculcated for success
जर तुम्हाला आयुष्यात सुपर सक्सेस मिळवायचे असेल तर श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या सवयींवर लक्ष केंद्रित करून त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आपल्या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत. गोल सेट करा व बाकी कचरा फेका. ज्याच्या आयुष्यात ध्येय नाही, तो मनुष्यप्राणी नाही. आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी वचनबध्द व्हा, ते पूर्ण झाल्याशिवाय मागे हटू नका.
ज्यातून काही लाभ होत नाही अशा अनावश्यक गोष्टींचा त्याग करा. दैनंदिन सवयी विकसित करा. पैसा व यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम सवयी लावणे ही मूलभूत गरज आहे. यशस्वी व अयशस्वी व्यक्तीमध्ये त्यांच्या दैनंदिन सवयी हाच फरक असतो. यश कोणाला सहज मिळत नसते, त्यासाठी खूप कष्ट, मेहनत, समर्पण व समृध्दीसाठी आवश्यक असणार्याा सवयी लावणे महत्वाचे असते.
उदा. सकाळी लवकर उठणे, डेली प्लॅन तयार करणे, सकस आहार, व्यायाम, ध्येय निश्चिती, टू डू लिस्ट बनवणे, वेळेस महत्व देणे, सर्व कामे वेळेवर पार पाडणे, वाचन करणे, हेतूपूर्वक जोखीम घेणे, नेटवर्किंग, संयम या सर्व सवयी यशस्वी व्यक्ती स्वतःला लावून घेतात. यश व्हीज्युअलाईझ करा. यशस्वी व्यक्ती स्वतःचे ध्येय सतत डोळ्यासमोर जिवंत ठेवून काम करतात. जेव्हा आपण आपले ध्येय व्हीज्युअलाईझ करतो, तेव्हा नवीन कौशल्ये आत्मसात करणे व चांगल्या सवयी स्वत:ला लावणे या गोष्टी सहजपणे होतात. आपले ध्येय दृष्यमान करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, ते व्हीज्युअलाईझ करा व पुढे चला. यशाचा मार्ग सापडत जाईल सर्व यशस्वी व्यक्ती यशाच्या व्हीज्युअलायझेशनचे महत्व जाणतात. प्रत्यक्ष काम करण्याअगोदर त्यांच्या यशाकडे जाण्याचा रोडमॅप हा त्यांच्या दृष्यमानतेच्या रूपात तयारच असतो. ती योग्यरित्या वापरली तर अत्यंत प्रभावी आहे. जर तुमच्या मनात तुम्ही तुमच्या ध्येयाचे व यशाचे चित्रच तयार केले नसेल तर तुमची अवस्था आंधळ्या माणसासारखी होईल. तुम्हाला यशाची संधी कधीच मिळणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App