नागपुरात संघ मुख्यालयासह अन्य ठिकाणांची जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून रेकी


वृत्तसंस्था

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षाव्यवस्थेत ढिलाई करण्यात आली या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय गदारोळ सुरू असताना नागपुरातून एका अत्यंत गंभीर बातमी आली आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह अन्य ठिकाणांची जैश-ए-मोहम्मद च्या दहशतवाद्यांनी रेकी केली आहे.Reiki from Jaish-e-Mohammed terrorists in other places including Sangh headquarters in Nagpur

ही बातमी महाराष्ट्र पोलिसांनी कन्फर्म केली आहे. या संदर्भात काल एक कॉल आला होता, असे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. याबाबतची तपशील माहिती पोलीस घेत आहेत परंतु ती माहिती आत्ता जाहीरपणे सांगण्यासारखे नाही, असेही त्यांनी सांगितले.https://t.co/s1idwLxMJS https://twitter.com/ANI/status/1479443673758666764?s=20

या संदर्भात नागपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणाला अटक झाली नसली तरी पोलिस यंत्रणा अलर्टवर आहे. याचे सर्व तपशील योग्य वेळेला जाहीर करण्यात येतील. सायबर सिक्युरिटी सारख्या महत्वाच्या विषयांवर देखील पोलीस तपास करत आहेत, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Reiki from Jaish-e-Mohammed terrorists in other places including Sangh headquarters in Nagpur

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी