वृत्तसंस्था
अमृतसर : अमृतसर येथे आज इटलीतून आलेल्या १९० विमान प्रवाशांना कोरोना झाल्याचे आढळल्याने एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान,सर्वच प्रवाशांना क्वारंटाइन केले आहे. Corona, 190 passengers from Italy, Chaos at Amritsar airport; Another shocking incident
अमृतसर येथील श्री गुरु रामदास विमानतळावर इटली या देशातून विमान प्रवासी उतरले. त्या पैकी १९० जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. रविवारी इटलीतून आलेल्या १७० पैकी १२५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. लागोपाठ दुसऱ्यांदा प्रवासी कोरोनाबाधित असल्याने विमानतळावर खळबळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इटलीतील मिलान येथून आज अमृतसर येथे विमान दाखल झाले. या विमानात एकूण २९० प्रवासी होते. या प्रवाशांची चाचणी करण्यात आली असता त्यातील १९० प्रवासी करोना बाधित आढळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बाधित रुग्णांसह सर्वच प्रवाशांना तत्काळ क्वारंटाइन करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App