RECORD VACCINATION : भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ! एक वर्ष-१५० कोटी लसीकरण!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन…


150 कोटी लसीचे डोस तेही एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, ही आकडेवारीनुसार मोठी संख्या आहे. जगातील बहुतांश देशांसाठी हे आश्चर्यापेक्षा कमी नाही.India crosses 150-crore Covid vaccination mark, says PM Modi


वृत्तसंस्था

नवी दिल्ली :लसीकरणाच्या बाबतीत आज भारतासाठी खुप महत्त्वपूर्ण दिवस आहे .लसीकरण हे कोरोना विरूद्ध प्रभावी अस्त्र आहे. देशभरात लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. भारताने आज कोरोना लसीकरणाच्या बाबतीत एक मोठा टप्पा गाठला आहे. देशात आतापर्यंत 150 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

या ऐतिहासिक कामगिरीबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे.शुक्रवारी दुपारपर्यंत भारताने हा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. यासोबतच देशातील 62 कोटींहून अधिक लोकांना पूर्ण लसीकरण करण्यात आलं आहे.



पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन-

या ऐतिहासिक कामगिरीबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. वर्षाची सुरुवात १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाने झाली. आणि आज, वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, भारताने 150 कोटी लसीचा ऐतिहासिक टप्पाही गाठला आहे.

150 कोटी लसीचे डोस तेही एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, ही आकडेवारीनुसार मोठी संख्या आहे. जगातील बहुतांश देशांसाठी हे आश्चर्यापेक्षा कमी नाही.भारतासाठी, हे नवीन इच्छाशक्तीचे प्रतीक आहे, अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी काहीही करण्याची हिंमत आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे.

लसीकरणाचा आकडा-

देशातील 87 कोटी 9 लाखांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याच वेळी, 62 कोटी 10 लाखांपेक्षा जास्त दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 वर्षांवरील 34 कोटी 98 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

दोन करोड मुलांचं लसीकरण

देशात किशोरवयीन मुलांचे लसीकरणही वाढत आहे. आतापर्यंत, 20 दशलक्षाहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 3 जानेवारीपासून किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.

India crosses 150-crore Covid vaccination mark, says PM Modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात