द केरल स्टोरी: धर्मांतराने पीडित 25 मुली निर्मात्याने आणल्या मीडियासमोर; मांडले केरळ मधले भयाण वास्तव!!


वृत्तसंस्था

मुंबई : “द केरल स्टोरी” सिनेमाच्या निर्मात्यांनी आज आपल्या वरच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना धर्मांतराने पीडित असलेल्या 25 मुली समोर आणल्या, इतकेच नाही तर केरळ मधले दुसरे भयाण वास्तव देखील विपुल शाह यांनी मांडले. The Kerala story film’s producer Vipul Shah says, “Britain’s censor certification agency had to give the certificate yesterday

केरळमध्ये लव्ह जिहाद आणि दहशतवाद यांच्याशी संबंधित असलेले वास्तव मांडणारा “द केरल स्टोरी” हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. पठाण सारख्या सिनेमाला त्याने बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे. परंतु लिबरल्स आणि बॉलीवूड मधील अनेक जण त्याला प्रपोगांडा फिल्म म्हणत आहेत. सिनेमावर झालेल्या या आरोपांना विपुल शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. त्याचवेळी त्यांनी केरळ मधल्या धर्मांतराने पीडित झालेल्या 25 मुलींना मीडियासमोर आणले. त्यांची कहाणी मीडियाला सांगितली.



आर्ष विद्या केंद्रातून या मुलींना योग्य वेळी मदत मिळाल्याने त्या स्वधर्मात म्हणजे हिंदू धर्मात परत येऊ शकल्या. आर्ष विद्या केंद्राचे काम मोठे आहे, असे विपुल शहा म्हणाले.

उत्तर केरळ दहशतवादाचे हब

त्याचवेळी विपुल शाह यांनी केरळचा भयानक चेहराही मीडियासमोर मांडला. केरळचे खरे म्हणजे दोन भाग आहेत. जे केरळ सिनेमातून दिसते ते बॅक वॉटर, निसर्ग सौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा हे तर आहेच, पण त्याचबरोबर उत्तर केरळमधील मलबार, कोझिकोड, कासरगोड आणि कर्नाटकचा दक्षिण भाग हा आता दहशतवादाचे हब बनला आहे. तिथे दहशतवादी संघटना आयएसआयएसचे ट्रेनिंग कॅम्प चालतात आणि तिथेच मुस्लिम मुलांना लव्ह जिहाद साठी चिथावणी देण्यात येते. आज मीडियासमोर आलेल्या 25 पीडित मुली या लव्ह जिहादच्याच बळी ठरल्या होत्या. पण आर्ष विद्या केंद्राच्या जागरूकतेमुळे त्या आपल्या धर्मात परत येऊ शकल्या. आत्तापर्यंत 7000 मुलींना आर्ष विद्या केंद्राने स्वधर्मात परत आणले आहे, अशी माहिती देऊन त्यांनी या केंद्रासाठी 51 लाख रुपयांची देणगी दिली.

The Kerala story film’s producer Vipul Shah says, “Britain’s censor certification agency had to give the certificate yesterday

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात