समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अकलेचे तारे, म्हणाले लग्नाला उशिर झाला तर मुली अश्लिल चित्रफिती पाहत बसतील म्हणून सोळाव्या वर्षीच करावे लग्न


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनी शुक्रवारी महिलांसाठी लग्नाचे कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अकलेचे तारे तोडले आहेत. लग्नाला उशिर झाला तर मुली अश्लिल चित्रफिती पाहत बसतील.Samajwadi Party MP said if marriage is delayed, girls should watch pornographic videos

जर मुलगी समजदार असेल तर तिचं लग्न 16 व्या वर्षी केलं तरी त्यात काही गैर नाही. जर मुलगी 18 व्या वर्षी मतदान करू शकते, तर ती लग्न का करू शकत नाही? असा सवाल केला आहे.केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.



या निर्णयानंतर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी त्यावर आपापली मतं व्यक्त केली आहेत. हसन यांनी केंद्राच्या या प्रस्तावावर आक्षेप नोंदवत म्हटले आहे की, मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 16-17 करण्यात यावे. लग्नाला उशीर झाला तर त्या मुली अश्लील व्हिडीओ (पोर्नोग्राफी) पाहात बसतील, घाणेरडे चित्रपट पाहतील आणि हे सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवे.

सपा खासदार एसटी हसन यांनी असेही सांगितले की, जर लग्न लवकर झाले तर त्या मुलीला लवकर मुलं होऊ शकतात, कारण प्रजननक्षमतेचे वय 15 ते 30 वर्षे आहे. अशा स्थितीत लग्नाचे वय वाढवू नये.

तत्पूर्वी समाजवादी पक्षाचे खासदार शफीक उर रहमान वर्क यांनी या प्रस्तावाबाबत आक्षेपार्ह विधान केले आणि लग्नाचे वय वाढवल्याने मुली आणखी बिघडतील, असं त्यांनी म्हटले होते.

Samajwadi Party MP said if marriage is delayed, girls should watch pornographic videos

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात