विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड ठाकरे सरकारचे लक्ष्य, आता कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरविणार, आशिष शेलार यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष्य करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. यासाठीच विद्यापीठ पदाच्या निवडीबाबतचे कायदे राज्य शासन बदलत आहे. राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल.Ashish Shelar alleges Thackeray government’s target of crores of rupees for vacant university plots, VC will now be decided in Kitchen Cabinet

एखाद्या सचिन वाझे सारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.शेलार म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत काल निर्णय झाला.



त्यामध्ये महाराष्ट्र सार्वजनीक विद्यापीठ कायद्या 2016 मध्ये बदल केले असुन कलम 9(अ) हे नवीन कलम टाकून राज्यपालांचे अधिकार काढून घेण्याचे काम सरकारने केले आहे. पुर्वीच्या कायद्यानुसार कुलगुरू निवड करण्यासाठी राज्यपाल शोध समिती गठीत करीत असत.

समितीमध्ये सवोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती किंवा उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश, बरोबरीने शिक्षण तज्ञ, पद्म पुरस्कार प्राप्त यासह उच्च शिक्षण विभागाचे सचिव अशी कमिटी गठीत करून ही समिती कुलगुरुपदासाठी अर्जदार व्यक्तींच्या कागदत्रांची छाननी करून त्यातील पाच नावांची शिफारस राज्यपालांना करीत असे. ठाकरे सरकारला हे मान्य नाही.

नवीन बदलानुसार आता कुलगुरू नियुक्तीसाठी सरकार एक समिती गठीत करणार आहे. त्यातील सदस्यही राज्य सरकारच ठरवणार आहेत. त्या समितीकडून जी नावे सुचविली जातील. त्यातील दोन नावे कुलपती म्हणून राज्यपालांकडे मांडली जाणार आहेत. याचा सरळसरळ राजकीय अर्थ असा आहे की, यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवले जातील.

यापुर्वी ठाकरे सरकारने केलेल्या नियुक्त्या पाहता एक नवीन सचिन वाझे विद्यापीठात नियुक्त करण्यात यावा, यासाठी हे अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतले आहेत, असा आरोप शेलार यांनी केलाय.
जो राजाबाई टॉवर एक काळ इंग्रजांसमोरही दिमाखात उभा राहिला त्या राजाबाई टॉवरला मंत्रालयासमोर झुकवण् याचे काम ठाकरे सरकार करते आहे. हाच अहंकार ठाकरे सरकारचा आहे.

मी ठरवेन तेच धोरण मीच बांधेन तेच तोरण हीच ठाकरे सरकारची कार्यपध्दती आहे. विद्यापीठांच्या स्वायत्तेवर हे आक्रमण आहे. हे नव्याने नसून यापुर्वी ज्यावेळी अंतीम वर्ष परिक्षांच्या विषयात ही असाच अहंकारी निर्णय घेण्यात आला होता. यापुर्वी विद्यापीठाच्या निविदांमध्ये सुध्दा हस्तक्षेप करण्यात आला होता.

विद्यापीठातील प्राध्यापक मंत्री कार्यालयात घेऊन पगार मात्र विद्यापीठाने द्यावे असेही करण्यात आले. अशा प्रकारे विद्यापीठांच्या निधीवर आक्रमण करण्यात आली असून आता एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे, अशी टीकाही शेलार यांनी केली आहे.

मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष्य करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. भूखंड लाटण्यासाठी असे कायदा बदल करण्यास सुरुवात झाली आहे असा आरोप करून शेलार म्हणाले, काही बातम्या त्याबाबत आल्या आहेत. एसआरएसाठी भूखंड देणे, काही रजिस्टर, तर काही रजिस्टर नसलेल्या संस्थांना भूखंड देणे सुरू आहे. त्यामुळे आपल्या मजीर्तील कुलगुरू विद्यापीठात बसविले जात असून भूखंड लाटण्यासाठी केलेले हे बदल आहेत.

Ashish Shelar alleges Thackeray government’s target of crores of rupees for vacant university plots, VC will now be decided in Kitchen Cabinet

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात