वृत्तसंस्था
अॅमस्टरडॅम : PM Modi स्वीडनमध्ये पंतप्रधान मोदींना ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा स्वीडनचा कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांना किंवा सरकार प्रमुखांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.PM Modi
रविवारी गोटेबर्ग येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींना हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मोदींना मिळालेला हा ३१ वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.PM Modi
मोदी ८ वर्षांनंतर स्वीडनला पोहोचले आहेत. यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये स्वीडनला भेट दिली होती. पंतप्रधान मोदींचे विमान स्वीडनच्या सीमेवर पोहोचताच सुरक्षेसाठी स्वीडिश लढाऊ विमानांनी त्याला संरक्षण दिले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी गोटेबर्ग विमानतळावर पोहोचले होते.PM Modi
पंतप्रधान मोदी भारतीय समुदायाची भेट घेऊ शकतात
स्वीडनमधील एका हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर, बंगाली पद्धतीची आरती आणि शास्त्रीय नृत्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी भारतीय समुदायाच्या सदस्यांनाही भेटू शकतात.
भारत आणि स्वीडन यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि हरित ऊर्जा यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याचीही शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App