भाजपला मोदींनी मिळवून दिला ४०० पार घोषणेचा खरा मकसद!!

Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवून दिला ४०० पार घोषणेचा खरा मकसद!!, असेच म्हणायची वेळ मोदींनी काल रात्री केलेल्या भाषणामुळे आली. महिला आरक्षणाचा विषय मोदींनी ज्या पद्धतीने मांडला, ती पद्धत पाहता मोदींनी तो विषय थेट ४०० पार या घोषणेशी नेऊन भिडवला. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नव्हते, तरीसुद्धा विरोधकांच्या विवेक बुद्धीच्या आधारावर आम्ही महिलांना आरक्षण द्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी विवेक बुद्धी वापरली नाही. त्यांनी महिला आरक्षणाचा विषय हाणून पाडला. सबब आता आम्हालाच पुरेसे संख्याबळ मिळवावे लागेल, असे समस्त भारतीयांच्या मनावर ठसविण्यात मोदी यशस्वी झाले. कालच्या भाषणात त्यांनी ४०० पारचा बिलकुल उल्लेख केला नाही, पण तरीही त्यांचा हेतू लपून राहिला नाही.Modi determine about women reservation

– २०२४ च्या निवडणुकीत ४०० पारचा नारा

२०२४ च्या निवडणुकीत मोदींनी आणि बाकीच्या भाजपच्या नेत्यांनी ४०० पारचा नारा जरूर दिला होता. त्यासाठी राजकीय कारणे सुद्धा भरपूर दिली होती, पण विरोधकांना सुद्धा त्यांनी आयते कोलीत हातात दिले होते. त्यामुळेच तर काँग्रेस सकट बाकीचे विरोधक मोदींना 400 खासदार हवेत, कारण त्यांना राज्यघटना बदलून टाकायची आहे, असा प्रचार करण्यात यशस्वी ठरले होते. विरोधकांनी मोदींना त्या निवडणुकीत ४०० जागा मिळू दिल्या नव्हत्या. मोदींना मित्र पक्षांच्या सहाय्याने सरकार बनविण्यास भाग पाडले होते. त्याचाच परिणाम म्हणून महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन विधेयक मंजूर करून घेण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. ही विधेयके मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक तेवढी दोन तृतीयांश मते सरकार मिळवू शकले नाही. मोदी सरकारला ३५२ खासदारांचा पाठिंबा मिळवता आला नाही.



– काँग्रेस वर महिला विरोधाचा ठपका

मोदींनी याच अपयशाचे खापर काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम, तृणमूल काँग्रेस यांच्यावर फोडून त्यांचे रुपांतर राजकीय यशाच्या संधीत करण्याचा “डाव” खेळला. त्यांनी म्हणे, ३० मिनिटांच्या भाषणात ६० वेळा काँग्रेसचे नाव घेतले. पण त्यांनी किती वेळा काँग्रेसचे नाव घेतले, यापेक्षा त्यांनी काँग्रेस वर महिला विरोधाचा ठपका कायमचा मारून ठेवला, ही खरी त्यांच्या भाषणातली “राजकीय मेख” ठरली. देशातल्या निम्म्या लोकसंख्येला काँग्रेसने आणि विरोधकांनी हक्कापासून वंचित ठेवले. महिलांना त्यांचा न्याय्य अधिकार मिळू दिला नाही, हे राजकीय सत्य भारतीय जनमानसावर ठसविण्यात मोदी यशस्वी ठरले.

– ४०० पारची खरी राजकीय गरज

त्यामुळेच तर महिला आरक्षणाचा संघर्ष पुढे नेण्यावर त्यांनी भर दिला. महिलांना आरक्षण पाहिजे असेल, देशाच्या निम्म्या लोकसंख्येला त्यांचे अधिकार हवे असतील, तर आम्हाला म्हणजेच भाजपला लोकसभेत तेवढे संख्याबळ लागेल. ते संख्याबळ ३५२ च्या पलीकडचे असेल. तेवढे संख्याबळ मिळाले, म्हणजेच भारतीय जनतेने भाजपला लोकसभेत तेवढे खासदार निवडून दिले, तर आणि तरच महिलांना ३३ % आरक्षण मिळेल. अन्यथा काँग्रेस आणि बाकीचे विरोधी पक्ष महिला आरक्षणाला कायम खोडा घालत राहतील, असा इशाराच मोदींनी कालच्या भाषणातून दिला. याचाच अर्थ मोदींनी भाजपला आणि मित्र पक्षांना ४०० पारच्या घोषणेचा खरा मकसद मिळवून दिला.

– ४०० पारचे राजकीय मर्म

महिला आरक्षण हवे असेल, ४०० खासदार निवडून आणावे लागतील. तेवढे खासदार निवडून आणायचे म्हणजे, त्या दृष्टीने काम करावे लागेल. त्यासाठी देशातल्या निम्म्या लोकसंख्येला पटवावे लागेल. महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम, योजना आखायला लागतील. त्यांची झपाट्याने अंमलबजावणी करावी लागेल. तसे केले तरच महिला भाजपला भरभरून मतदान करतील. भाजप आणि मित्र पक्षांचे ४०० खासदार निवडून आले तरच ३३ % महिला आरक्षण देता येईल, हेच “राजकीय मर्म” मोदींनी कालच्या भाषणातून समजावून सांगितले. त्यांनी कुठलाही आकडा सांगितला नाही, पण त्यांनी भाषणाच्या between the lines मध्ये लपवून ठेवलेला ४०० पारचा आकडा अनेकांच्या चाणाक्ष नजरेतून सुटला देखील नाही!!

Modi determine about women reservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात