विशेष प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथे एका रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.Eight people including a child die in a horrific car accident in Bareilly
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. महामार्गावर भोजीपुराजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली.
या धडकेनंतर कारला आग लागली, ज्यात एका मुलासह आठ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App