VIDEO : कुख्यात माफिया अतीक अहमद प्रसारमाध्यमांना म्हणतो, ‘’तुमचा आभारी आहे, तुमच्यामुळेच…’’


साबरमती कारागृहातून अतीक अहमदला नैनी कारागृहात आणले असून, उद्या भाऊ अशरफसह त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे

विशेष प्रतिनिधी

प्रयागराज : कुख्यात माफिया अतिक अहमदसह उत्तर प्रदेश पोलीस पुन्हा एकदा साबरमती कारागृहातून प्रयागराजला पोहोचले आहेत. अतिकला कडेकोट बंदोबस्तात नैनी तुरुंगात ठेवण्यात आले आहे. साबरमती कारागृहातून बाहेर आल्यानंतर वाटेत अतिकशी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी अतिकने माध्यमांचे आभार मानले. ‘’तुमच्यामुळेच मी सुरक्षित आहे.’’, असे सांगितले. Mafia Atiq Ahmed who is in police custody thanked the media

दुसरीकडे, माफिया अतिक अहमदचा भाऊ अशरफ यालाही कडक सुरक्षा व्यवस्थेत प्रयागराजमध्ये आणण्यात आले आहे. दोघांना उद्या म्हणजेच गुरुवारी सीजेएम कोर्टात हजर केले जाणार आहे. अश्रफला घेऊन येत असताना रायबरेलीमध्ये पोलिसांच्या वाहनाची मोडतोड झाली होती.

अतिक अहमदला घेऊन जाणारा पोलिसांचा ताफा मंगळवारी दुपारनंतरच साबरमती कारागृहातून बाहेर पडला होता. दुसरीकडे बुधवारी सकाळी अतिक अहमदला घेऊन जाणारा ताफा मध्य प्रदेशातील शिवपुरी येथून चालत यूपीच्या हद्दीत दाखल झाला. त्यानंतर हा ताफा झाशीमार्गे प्रयागराजला पोहोचला.

नुकतेच २७ मार्चला अतिक अहमदला साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्याला २००८ च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात आणण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता प्रयागराज पोलिसांनी उमेश पाल हत्येप्रकरणी कोर्टात प्राथमिक आरोपपत्र दाखल केले आहे.

Mafia Atiq Ahmed who is in police custody thanked the media

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात