कोरोनावरील कोव्हॅक्सिन लस केवळ ५० टक्केच प्रभावी


 

नवी दिल्ली – कोरोनावरील कोव्हॅक्सिन ही लस केवळ ५० टक्केच प्रभावी असल्याचे लॅन्सेट या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.Covaxine is 50 percent emminent

लॅन्सेट नियतकालिकामध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून कोवॅक्सिन लसीबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या अभ्यासाच्या कालावधीत भारतात आढळणाऱ्या एकूण करोनाबाधितांपैकी तब्बल ८० टक्के रुग्ण हे कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराने बाधित असल्याचेही स्पष्ट झाले आहे.हा अभ्यास प्रामुख्याने देशात करोनाची दुसरी लाट सर्वाधिक गंभीर असताना करण्यात आला. या काळात दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील करोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने अभ्यासासाठी घेण्यात आले होते.

या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले होते. यातील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर देखील करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले.

Covaxine is 50 percent emminent

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*