आमच्याकडेही तुमच्या नेत्यांचे फोटो आणि जोडे; सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचे बाळासाहेब थोरातांकडून समर्थन


प्रतिनिधी

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारी वक्तव्ये खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने केली आहेत. त्यामुळे शिवसेना – भाजपच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या दारात त्यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन केले. या आधी असे आंदोलन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात केले होते. सावरकरांचा अपमान केल्याबद्दल बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते.We also have photos and videos of your leaders; Balasaheb Thorat supports Rahul Gandhi who insulted Savarkar

मात्र, आता राहुल गांधींच्या समर्थनासाठी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुढे आले आहेत. तुम्ही आमच्या नेत्यांच्या फोटोला जोडे मारलेत. आमच्याकडेही तुमच्या नेत्यांचे फोटो आणि जोडे दोन्ही आहेत, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना-भाजपच्या नेत्यांना दम दिला आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या बाजूने बाळासाहेब थोरात अशी दमबाजी करीत पुढे आले आहेत.



मणिशंकर नंतर राहुल गांधींना जोडे मारा आंदोलन

याआधी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पेट्रोलियम मंत्री, मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे मारा आंदोलन केले होते. आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेना – भाजपच्या आमदारांनी त्याचेच अनुकरण करत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध जोडणारा आंदोलन केले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमानकारक उल्लेख केला. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. गुरुवार, २३ मार्च रोजी विधिमंडळात हा विषय चांगलाच पेटला आणि भाजपच्या आमदारांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्या आमदारांनी जे जोडो मारो आंदोलन केले. त्यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार आशिष शेलार, आमदार योगेश सागर यांच्यासह अनेक आमदार हे राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

राहुल गांधी यांनी हिंदू नववर्षाच्या दिवशी ज्या प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला तो हिंदूंचा अपमान असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाचा आदर केला, त्यासाठी लढा दिला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणे म्हणजे हिंदूचा अपमान करणे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांना जोडे मारले आहेत. देशद्रोही राहुल गांधी यांनी देशाची आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी, ही आमची मागणी आहे, असे आमदार प्रसाद लाड म्हणाले.

आता जनाब उद्धव ठाकरेच म्हणावे लागेल

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे, त्यांना काहीही म्हटले तरी फरक पडत नाही. त्यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आदराबाबत कोणतीही अपेक्षा ठेवता येणार नाही. आता उद्धव ठाकरेंना जनाब उद्धव ठाकरेच म्हणावे लागेल, अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली.

We also have photos and videos of your leaders; Balasaheb Thorat supports Rahul Gandhi who insulted Savarkar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात