शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण ; वर्धा जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे महात्मा गांधी पुतळा ते शहिद स्मारक कॅंडल मार्च


या कायद्यांचा सुरूवातीपासूनच काॅंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व समस्त काँग्रेस पक्षाने प्रखर विरोध केलेला आहे.Tribute to martyred farmers; From Mahatma Gandhi Statue to Martyrs’ Memorial Candle March by Wardha District Congress Committee


विशेष प्रतिनिधी

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर रोजी देशवासियांना संबोधित करत तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे कायदे परत घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींवर अनेक राजकीय नेत्यांनी टीका केल्या.

तसेच या कायद्यांचा सुरूवातीपासूनच काॅंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व समस्त काँग्रेस पक्षाने प्रखर विरोध केलेला आहे.दरम्यान आज कायदे परत घेण्याचा निर्णय घेतल्यावर हा दिवस काँग्रेस पक्षाने शेतकरी सन्मान दिवस म्हणुन पुर्ण भारतभर पाळण्याचे ठरवले.



यावेळी वर्धा जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे हा दिवस शेतकरी आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली म्हणून आज महात्मा गांधी पुतळा ते शहिद स्मारक कॅंडल मार्च काढण्यात आली.

ही कॅंडल मार्च रॅली भारतीय राष्ट्रीय कांग्रेस वर्धा जिल्ह्याचे प्रभारी जिया पटेल यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.यावेळी जिलाध्यक्ष मनोज चांदुरकर, ज्येष्ठ कांगे्रस नेता शिरीष गोडे, माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, प्रदेश सचिव चंद्रकांत काकडे, तहसील अध्यक्ष बालाभाऊ जगताप, विदर्भ प्रदेशाध्यक्ष महिला इंटक अर्चना भोमले, जिला महिला कांग्रेस की महासचिव सपना शेंडे, कांग्रेस की महिला शहराध्यक्ष अरुणा धोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tribute to martyred farmers; From Mahatma Gandhi Statue to Martyrs’ Memorial Candle March by Wardha District Congress Committee

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात