राज्य सरकारने राज्यातील सर्व MPSC विग्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.


येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.The state government has given a big relief to all the MPSC students in the state.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : MPSC परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना एका वर्षाची मुदत वाढवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना राज्यसरकार दिलासा देणार आहे.येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.



‘ दोन वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी MPSC विद्यार्थ्यांनी केली होती.याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून एक वर्षाची मुदत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री, सामान्य प्रशासन विभागाचे दत्ता भरणे यांनी दिली आहे.

The state government has given a big relief to all the MPSC students in the state.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात