प्रतिनिधी
मुंबई : तिकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेची संभाजीनगर मध्ये जोरदार तयारी सुरू आहे आणि इकडे मुंबई पवार – ठाकरे आणि नागपुरात गडकरी – पवार यांच्या भेटीगाठी आज दुपारनंतर रंगल्या. राज्यातले राजकारण आजच्या दिवसभरातल्या घडामोडींनी प्रचंड ढवळून निघाले.Strong preparation for Rajya Sabha: Pawar – Thackeray, Gadkari – Pawar “political meeting” .
राज ठाकरे आज मुंबईहून पुण्याला पोहोचले. त्यावेळी रस्त्यावर गावा गावांच्या आणि शहरांच्या वेषींवर मनसैनिकांनी फुले उधळून त्यांचे जोरदार स्वागत केले. पुण्यात त्यांनी मनसैनिकांची बैठक घेतली राज ठाकरे यांचा पुणे दौरा सुरू असतानाच इकडे अचानक शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर भेट घेऊन दीड तास चर्चा केली. या चर्चेत नेमके काय घडले याची खरी बातमी कोणाला समजली नसली, तरी त्यावर लगेच तर्कवितर्क सुरू झाले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना वर्षावर स्नेहभोजन दिले. त्यावेळच्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व खासदारांना मनसे आणि भाजपवर तुटून पडण्याचे आदेश दिल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या. पण खात्रीलायक बातमी कोणाकडेच नव्हती.
वर्षावर ठाकरे – पवार यांच्या भेटीची आणि शिवसेना खासदारांच्या स्नेहभोजनाचा बातमी येताच तिकडे नागपुरातून तिसरी बातमी आली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासमवेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील होते. त्यामुळे देखील राज्यात चर्चेला उधाण आले.
तिकडे आज दुपारी देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब पाटील दानवे यांनी मुंबईत भायखळा रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी एसी लोकलच्या भाड्यामध्ये तब्बल 50 % घट केल्याची घोषणा केली.
राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात या मोठ्या घडामोडी घडल्याने राज्यात राजकीय उलथापालथी चर्चा सुरू झाली. मात्र या भेटीगाठींमध्ये नेमके काय घडले? कोण कुणाला काय म्हणाले? याची प्रत्यक्ष माहिती मात्र कोणाकडेच नव्हती. सगळ्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या. पण ही सूत्रे कोण? आणि त्यांचे ऐकले कोणी? हे मात्र कोणालाही समजले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App