Sanskrit : डॉ. आंबेडकरांना हवी होती संस्कृत राष्ट्रभाषा!!; मांडला होता घटना समितीत प्रस्ताव


प्रतिनिधी

नवी दिल्ली : बॉलिवूड विरुद्ध साऊथ सिनेमा असा हिंदी आणि प्रादेशिक भाषा असा वाद रंगला असताना राष्ट्रभाषा नेमकी कोणती असावी?, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.Ambedkar wanted Sanskrit as national language !!; The proposal was tabled in the incident committee

या पार्श्वभूमीवर राष्ट्रभाषेचा वाद नेमका काय आहे?, याचा मागोवा घेतला असता एक वेगळीच बाब समोर आली ती म्हणजे घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संस्कृत ही राष्ट्रभाषा म्हणून हवी होती. तसा प्रस्ताव देखील त्यांनी घटना समितीत केंद्रीय कायदे मंत्री म्हणून मांडला होता. 10 सप्टेंबर 1949 रोजी हा प्रस्ताव घटना समितीत मांडल्याच्या बातम्या त्यावेळी विविध वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रांनी दिल्या होत्या.

बॉलीवूड सुपरस्टार अजय देवाण याने हिंदीत साउथ फिल्म डब करून का वापरता?, असा सवाल केला होता. त्यावर साउथ फिल्म इंडस्ट्री मधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हा वाद नंतर दक्षिणेतल्या प्रादेशिक भाषा विरुद्ध हिंदी या वळणावर गेला. यामध्ये कर्नाटकातल्या राजकीय नेत्यांनी देखील उडी घेतली. काँग्रेस नेते सिद्धरामय्या माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमार स्वामी यांनी अजय देवगणवर शरसंधान साधले.

या पार्श्वभूमीवर घटना समितीत भारताची एकच राष्ट्रभाषा असावी यावर जो विचारविनिमय झाला, त्यामध्ये कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही भाषा राष्ट्रभाषा असा प्रस्ताव मांडला होता. त्याला त्या वेळचे परराष्ट्र राज्यमंत्री बी. व्ही. केसकर, नेहरू मंत्रिमंडळातल्या दुसरे मंत्री निजामुद्दीन अहमद यांनी पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर घटना समिती अनेक सदस्य टी. टी. कृष्णम्माचारी, दुर्गाबाई देशमुख यांनी देखील पाठिंबादर्शक स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या चर्चेच्या बातम्या आणि प्रस्तावाच्या बातम्या त्यावेळच्या जवळपास सर्व वर्तमानपत्रांनी नावासहित दिल्या होत्या.

हिंदी विरुद्ध दक्षिणी प्रादेशिक भाषा रंगला असताना अभिनेत्री कंगना राणावत हिनेदेखील संस्कृती राष्ट्रभाषा विशेष कारण सर्व दक्षिणी भाषा संस्कृतोद्भव आहेत. संस्कृत सर्वात जुनी भाषा आहे, असे म्हटले आहे.

Ambedkar wanted Sanskrit as national language !!; The proposal was tabled in the incident committee.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात