एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यानुसार बडतर्फीची नोटीस पाठविण्यात येत आहे.ST employees should get back to work, it’s not too late yet; Administration warning
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून राज्यभर एसटी कर्मचारी सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत विलिनीकरण नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत.दरम्यान आता संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु आहे.
आत्तापर्यंत 1500 हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे.जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत, त्यांना घरी पाठवणार, असेच संकेत एसटी महामंडळ प्रशासनाने दिले आहेत.
एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यानुसार बडतर्फीची नोटीस पाठविण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, अजूनही वेळ गेलेली नाही, असे संकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.पण जे कर्मचारी संपावर ठाम राहतील त्यांना घरीच पाठविले जाईल, असे बडतर्फीच्या कारवाईतून देण्यात येत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App