पवार म्हणतात, अनिल देशमुखांवर राजकीय सूडाने कारवाई; किरीट सोमय्या यांनी दिले प्रत्युत्तर!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून आरोपपत्र दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात येत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल एका मुलाखतीत केला आहे. या दाव्याला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Pawar says action against Anil Deshmukh with political revenge; Reply by Kirit Somaiya !!

अनिलत देशमुखांबरोबर त्यांची दोन मुलेही आरोपी आहेत, याकडे किरीट सोमय्या यांनी लक्ष वेधले आहे. अनिल देशमुख यांच्या वरचे बाकीचे सर्व आरोप रद्द झाले आहेत. त्यांच्या संस्थेला देणगी घेतल्याचा एकमेव आरोप शिल्लक आहे, असा दावा शरद पवार यांनी काल लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्यावरची कारवाई राजकीय सूडापोटी असल्याचा दावाही पवार यांनी केला होता.शरद पवार यांच्या या दाव्यावर किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या म्हणाले, की अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाखल झालेले आरोप पत्र अंतिम नाही. ते आणि त्यांची दोन मुले याबाबत आरोपी आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांना सक्तवसुली संचालनालयापुढे शरणागती पत्करावी लागेल. अन्यथा कोर्टात जामिनासाठी अर्ज करावा लागेल. शिवाय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील चौकशी अद्याप सुरु आहे. यामध्ये अनिल देशमुख यांना हिशेब द्यावाच लागेल. त्यांचे सीए आणि त्यांचे वकील हे दोघेही या प्रकरणात आरोपी आहेत, याकडे देखील किरीट सोमय्या यांनी लक्ष वेधले आहे.

Pawar says action against Anil Deshmukh with political revenge; Reply by Kirit Somaiya !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात