विशेष प्रतिनिधी
नांदेड : हिंदू धर्म हा एका ध्वजाखाली आणण्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करणार असल्याचा निर्धार श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी व्यक्त केला असून लव्ह जिहादचे षडयंत्र हाणून पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.Hinduism will be brought under one flag;The conspiracy of love jihad will be defeated
नांदेड येथे हिंदू जागर मेळावा आयोजित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.हिंदू जनजागृसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले श्री कालीपुत्र कालीचरण महाराज म्हणाले, हिंदू धर्म हा एका ध्वजाखाली आला पाहिजे त्यासाठी आम्ही मराठवाडा दौरा काढलेला आहे.
या दौऱ्यामध्ये हिंदूमध्ये जनजागृती करण्यासाठी संत महंत व हिंदू जनजागृतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी फिरत आहोत.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद हे एक षडयंत्र रचले जात आहे. त्यावर ती एक आध्यात्मिक गुरू म्हणून ते म्हणाले हे फक्त लव्ह जिहाद हे एकच प्रकरण नसून अशी अनेक प्रकरण संपूर्ण भारतामध्ये सुरु आहेत.
गोहत्या असो काश्मीरचा प्रश्न असो इंडिया-पाकिस्तान असो असे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी आम्ही ही यात्रा प्रारंभ केली आहे. हिंदू मुलींना फूस लावून मुसलमान करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ते हाणून पाडले जातील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App