सध्या कमी पगार आहे. तसेच पगारात वाढ होत नसल्यामुळे मानसिक तणावात येऊन खोरगडे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला.Bus conductor attempts suicide by drinking poison in Palghar; She is in critical condition and is undergoing treatment at Nashik District Hospital
विशेष प्रतिनिधी
पालघर : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मुख्य मागणीसह राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप मिटणार नाही, असा ठाम निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय.
दरम्यान कर्मचारी संपावर असल्यामुळे बसफेऱ्या बंद आहेत. राज्यभर हे आंदोलन पसरले आहे. या आंदोलनात पालघर जिल्ह्यातील जव्हार बस डेपोतील एका बस कंडक्टरने (वाहक) विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या बस कंडक्टरचे नाव दीपक खोरगडे (वय वर्षे ३०) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोरगडे यांची प्रकृती नाजूक असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलविले आहे.पालघर जिल्ह्यातील जव्हार बस डेपोतील दीपक खोरगडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या कमी पगार आहे. तसेच पगारात वाढ होत नसल्यामुळे मानसिक तणावात येऊन खोरगडे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला खोरगडे यांच्यावर जव्हार कुटीर रूग्णालयात उपचार सुरु होते. परंतु प्रकृती नाजुक असल्यामुळे आता त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.आता नाशिक जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App