अशोक चव्हाणांना मोठा हादरा, देगलूर बाजार समितीवर भाजपची एकहाती सत्ता

Big shock to Ashok Chavan, BJPs one sided power over Deglaur market committee

Deglaur market committee : येथील देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अशोक चव्हाण यांना जबरदस्त धक्का बसला आहे. येथे भाजपप्रणीत पॅनलने झेंडा फडकावला असून विरोधातील महाविकास आघाडी पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. भाजप पॅनलचे सर्वच सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. Big shock to Ashok Chavan, BJPs one sided power over Deglaur market committee


प्रतिनिधी

नांदेड : येथील देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अशोक चव्हाण यांना जबरदस्त धक्का बसला आहे. येथे भाजपप्रणीत पॅनलने झेंडा फडकावला असून विरोधातील महाविकास आघाडी पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. भाजप पॅनलचे सर्वच सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत.

देगलूर बाजार समितीच्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत हा निकाल आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी ताकद लावूनही, येथे भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे.

तथापि, भाजपने येथे बाजार समिती ताब्यात घेऊन तालुक्यात पक्षाला उभारी देण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. भाजपच्या या विजयामुळे काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Big shock to Ashok Chavan, BJPs one sided power over Deglaur market committee

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात