महाराष्ट्रात मराठी भाषा भवन उभारण्याच्या प्रतीक्षेत; उर्दू घरांवर मात्र कोट्यवधींची तरतूद आणि अनुदानाची खैरात!!


प्रतिनिधी

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून राज्यातील मराठी भाषा भवन उभारण्याचा मुद्दा प्रलंबित आहे. बऱ्याच काळानंतर मराठी भाषा भवनासाठी चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवनात जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्याला वर्ष उलटले तरी भवन उभे करण्याचे कोणतेही प्रयत्न सुरु नाहीत. याउलट उर्दू घरावर मात्र कोट्यवधींची तरतूद आणि अनुदानाची खैरात महाविकास आघाडी सरकार करत आहे. Awaiting construction of Marathi Bhasha Bhavan in Maharashtra; On Urdu houses, however, the provision of crores and the grant of grants !!

 7 कोटींची तरतूद, वर 1 कोटीचे अनुदान

येणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त सरकार मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय घेईल, अशी आशा अनेक भाषा प्रेमींना होती. परंतु याउलट सरकारने उर्दू घरावर कोट्यवधींची तरतूद केली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील उर्दू घरांचा वापर, देखभाल व दुरुस्ती तसेच उर्दू घरे सुस्थितीत ठेवण्यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. उर्दू घरासाठी सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ७ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. ही उर्दू घरे सुस्थितीत ठेवण्यासाठी सरकारने आता १ कोटीचे अनुदान दिले असून हे अनुदान नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. तसेच या उर्दू घरांमधून उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. हिंदुस्थान पोस्टने ही बातमी दिली आहे.अनुदानाचे असे होणार वितरण

१. ग्रंथालयासाठी ३ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत वर्तमानपत्राचा खर्च- १९ हजार ४६० रुपये

  • २. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन
  • व्यवस्थापक ५३ हजार ६६६ रुपये प्रतिमास
  •  ग्रंथपाल २ लाख १६ हजार ६६७ रुपये ६ महिन्यांकरता
  •  लिपिक कंत्राटी कर्मचारी २ लाख १० हजार रुपये, १० महिन्यांकरता
  •  व्यवस्थापक १ लाख ५ हजार रुपये, १० महिन्यांकरता

३. पाणी व वीज बिल – ६७ हजार ६५ रुपये

४. कार्यालयीन व आकस्मिक खर्च – पाच हजार रुपये

५. ग्रंथालयासाठी प्रिटींग व लेखन साहित्य – १२ हजार रुपये

६. उर्दू घरासाठी स्टेशनरी, प्रिटींग व लेखन साहित्य – २२ हजार रुपये

७. सांस्कृतिक समिती व उप समिती सदस्यांचे मानधन – २० हजार रुपये

८. उर्दू घर नेटवर्क ( वायफाय सुविधा आणि ई-वाचनालय) १ लाख ४० हजार रुपये

९. – उर्दू घर येथे प्रोजेक्टर, सिस्टीम व साउंड सिस्टीम उभारणी करणे- ४ लाख १९ हजार ७६३ रुपये
– उर्दू घरासाठी अतिरिक्त फर्निचर, लॉन इत्यादी – २० लाख ४३ हजार ४०० रुपये
– उर्दू घर येथील ग्रंथालयासाठी पुस्तके व डिजीटल ग्रंथालय उभारणी करणे – १८ लाख ६८ हजार

१०. उर्दू घर येथे सोई सुविधा उपलब्ध करुन देणे व देखभाल दुरुस्तीसाठी बाह्ययंत्रणेची नियुक्ती ६४ लाख ९५ हजार रुपये

एकूण खर्च- १ कोटी १६ लाख ९६ हजार ६८८ रुपये   

 मराठी भाषा भवन मात्र प्रतीक्षेत

सरकारने मराठी भाषा भवन उभारण्याचा मुद्दा अद्यापही प्रलंबित ठेवला असून उर्दू भवनाला झुकते माप देत, अनुदान मंजूर केले आहे. आता २७ फेब्रुवारी अर्थात मराठी भाषा दिन जवळ येत आहे. तरीही, मराठी भवन उभे करण्याचे कोणतेही प्रयत्न सुरु नाहीत.

Awaiting construction of Marathi Bhasha Bhavan in Maharashtra; On Urdu houses, however, the provision of crores and the grant of grants !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण