वृत्तसंस्था
अहमदनगर : करुणा धनंजय मुंडे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे.शिवशक्ती सेना, असे पक्षाचे नाव आहे. याबाबतची घोषणा त्यांनी अहमदनगरमध्ये केली. Announcement of Shiv Shakti Sena New party by Karuna Dhananjay Munde
सामाजिक कार्य करताना राज्यात भ्रष्टाचार उफाळून आल्याचे लक्षात आल्याने त्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी हा पक्ष स्थापन केल्याचे वृत्त असून समाजिक कार्यकर्त्यांनी पक्षात यावे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार असल्याचे त्या म्हणाल्या.
मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे घोटाळे होतात. पक्ष प्रवेश, तिकीट आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत. एक-एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा आहे. भ्रष्टाचार मंत्री करतात आणि अधिकारी, पोलिस अधिकारी बळी दिले जातात, हे मी २५ वर्ष पाहिले आहे. त्यामुळे आता हे सर्व संपवायचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App