आम्ही काढलेल्या ऑर्डरचा परिणाम पाहायला मिळतोय; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे आल्यापासून हॉटेल मालकांचे आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात एफडीएने हॉटेल्सवर आणि दूध उत्पादकांसह राज्यातील अनेक प्रसिद्ध दुकानांवरही कारवाई करत त्यांचे परवानेही रद्द केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी नवीन नियमावली बनवली होती. यानंतर आता शिशु प्रोडक्टवर आईचे दूध सर्वोत्तम लिहिणे बंधनकारक केले आहे. Tukaram Mundhe

पत्रकार परिषद विविध मुद्यांवर भाष्य करताना तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागानं आतापर्यंत 22 रेग्युलेशन आणली आहेत आणि 11 ऑर्डर काढल्या आहेत. त्या ऑर्डरचा परिणाम पाहायला मिळतोय, अशी माहिती दिली. तसेच शाळेच्या संदर्भात आपण बॅलेन्स डायटच्या बाबतीत एक ऑर्डर काढली होती. त्याचे परिणाम दिसून येत आहे. त्या ऑर्डरमध्ये मी म्हटले होते की, आपण सर्वसाधारणपणे 22 महिन्यांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ती ऑर्डर लागू आहे. पण महत्त्वाचा मुद्दा येतो की, 22 महिन्यांपर्यंतच्या मुलांचं काय? म्हणजे दोन वर्षांपर्यंतच्या मुलांचं काय? अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांची काळजी न घेता, त्याच्या अगोदरच्या मुलांची काळजी घेतली गेली पाहिजे, यासाठी काही नियम आहेत आणि त्यासंदर्भात नियमावली घोषित करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने आजच्या ऑर्डरमध्ये आपण तो विषय हाताळत आहोत, असे त्यांनी म्हटले.



तुकाराम मुंढे म्हणाले की, नवी जन्माला आलेल्या मुलांपासून 2 वर्षांपर्यंतच्या मुलांपर्यंत त्यांना जे फूड दिलं जातं किंवा फूड सबस्टिट्यूट दिलं जातं, त्याच्याबद्दलचे काही नियम आहेत. त्यामध्ये आयएमएस अ‍ॅक्ट 1992 आहे. त्या अ‍ॅक्टची 2003 मध्ये अमेंडमेंट झाली आणि 2020 मध्ये यासंदर्भात रेग्यूलेशन झाले. ते नियम पाळणे, त्याची अंमलबजावणी करणं आणि त्याच्या माध्यमातून सेल्फ हेल्थ व सेल्फ फूड तयार करणं, हा त्यामागचा उद्देश आहे. त्या दृष्टीकोनातून आज आपण एक ऑर्डर इश्यू करत आहे, असे त्यांनी सांगितले.

तुकाराम मुंढे म्हणाले की, 2 वर्षांच्या खालील मुलांना पॅकेजमधून दिलं जाणारं प्रत्येक उत्पादन जे असेल. मग त्यात शिशु फॉर्म्युला, शिशु दूध अन्न, यासह इतर गोष्टी असतात. पॅक बंद शिशु अन्न 6 महिन्यानंतर 2 वर्षापर्यंत दिलं जातं. त्यामुळे 6 महिन्यांपर्यंत आईचे दूध शिशुला द्यावे. यासाठी आता शिशु प्रोडक्टवर ‘आईचे दूध सर्वोत्तम’ लिहिणे बंधनकारक असेल. ही ऑर्डर पुरवठादार, ब्रँड मालक आणि ई-कॉमर्स विक्रेते अशा सगळ्यांना लागू राहील. कारण गेल्या काही महिन्यात आम्ही राज्यभरात याबाबत तपास केला आहे. ‘आईचं दूध सर्वोत्तम’ अशा प्रकारची सूचना शिशु प्रोडक्टवर पुढील बाजूला हवी, ती अनेक ठिकाणी दिसली नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्यवर परिणाम होतोय. अन्न कोणत्या वेळेपासून द्यावं, हे सांगणारी सूचना देखील त्यात नाही. याशिवाय इशारा सूचना देखील आढळल्या नाहीत. त्यामुळे शिशु प्रोडक्टवर ‘आईचे दूध सर्वोत्तम’ अशी सूचना यापुढे आवश्यक असणार आहे.

तुकाराम मुंढे स्पष्ट करताना म्हणाले की, फॉर्म्युला मिल्कला बंदी नाही, पण नियम पाळणे गरजेचं आहे. कारण हेल्थवर याचा परिणाम कसा होतो, याचा डेटा आमच्याकडे आहे. बालकांना आहार चुकीच्या पद्धतीने जात आहे. 6 महिन्यांखालील मुलांचे आईच्या दुधाचे स्तनपानाचे प्रमाण पाच वर्षात 63.7 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत आलं आहे. शिशुच्या जन्मानंतर पहिले 6 महिने आईचेच दूध द्यायचं असतं, पण ते कमी झालंय. राज्यातील शहरी भागात 52 टक्के स्तनपान केलं जातं, तर ग्रामीण भागात 75 टक्के स्तनपानाचे प्रमाण आहे. यामध्ये शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्थिती चांगली आहे. डिलेव्हरी झाल्यानंतर 1 तासात स्तनपान झालं पाहिजे. मात्र याची आकडेवारीही कमी होत चालली आहे. याचाच अर्थ असा आहे की, 50 टक्के महाराष्ट्रामधील माता मुलं जन्मल्यानंतर तासाभरात दूध पाजत नाही. डॉक्टर व्यवस्थित माहिती देत नाहीत असा याचा अर्थ होतो. पण या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर बालकांच्या होत आहे. वयोगट 10 ते 12 वर्ष पाहिला तर 35 टक्के बीपी आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण दिसून येत आहेत. 10 ते 19 वयोगट पाहिला तर मधुमेहचं प्रमाण 12.3 टक्के आहे, असे म्हणत तुकाराम मुंढे यांनी चिंता व्यक्त केली.

Our orders are showing results, says FDA Commissioner Tukaram Mundhe

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात