मातंग समाजाच्या महामोर्चामुळे CSMT परिसर ठप्प; उपवर्गीकरणाच्या मागणीवर आंदोलक आक्रमक, मुंबई न सोडण्याचा इशारा

Matang community

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी (29 सप्टेंबर) मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातून मोठ्या संख्येने मातंग समाजाचे बांधव मुंबईत दाखल झाल्याने दक्षिण मुंबईतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सकाळच्या गर्दीच्या वेळेत आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात ठिय्या दिल्याने या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. Matang community

अनुसूचित जातींसाठी असलेल्या 13 टक्के आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ अशा पद्धतीने उपवर्गीकरण करून त्याची अंमलबजावणी करावी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. याबाबत शासन निर्णय जारी होईपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत राज्यांना अधिकार असल्याचा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रातही या मुद्द्यावरून मागणी जोर धरली आहे. या निर्णयाची राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी भूमिका सकल मातंग समाजाकडून घेण्यात आली आहे.

यासोबतच अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी द्यावा आणि मातंग समाजासाठीच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा मागण्याही आंदोलकांकडून करण्यात आल्या आहेत.

आझाद मैदानाच्या दिशेने मोर्चा

हातात निळे आणि लाल झेंडे घेत आंदोलकांनी आझाद मैदानाच्या दिशेने मोर्चा काढला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याने CSMT स्थानक परिसर, मुंबई महापालिका मुख्यालय, डी. एन. रोड आणि हुतात्मा चौक परिसरात वाहतूक कोंडी झाली.



रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ऐन कामाच्या वेळेत झालेल्या या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीचे नियोजन पोलिसांसमोर आव्हान ठरले.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त; काही आंदोलकांची धरपकड

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी काही मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्यांकडे वळवली. मात्र, आंदोलनस्थळी मोठी गर्दी झाल्याने वाहनांची वाहतूक काही काळ खोळंबली.

दरम्यान, मोर्चामध्ये महिलांची उपस्थितीही वाढत गेली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आंदोलकांना एका ठिकाणी थांबवण्याचे आणि वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आले.

काही आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, उपवर्गीकरणाबाबत शासन निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

CSMT area brought to a standstill due to the Matang community’s massive rally.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात