ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार; दोन राऊंड फायरिंगमध्ये प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाणे शहरात पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रदीप बाळा पूर्णेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी दोन राऊंड गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पूर्णेकर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आर मॉलजवळील इन्फिनिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णेकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबाराची माहिती मिळताच कापूरबावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांनी कोणत्या कारणातून गोळीबार केला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील परिस्थितीची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध माहिती तपासली जात असल्याची शक्यता आहे. गोळीबारामागे वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य की अन्य कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, सोमवारी उशिरापर्यंत याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.



दरम्यान, 29 सप्टेंबर रोजी एकता गाव बचाव कृती समितीतर्फे उपोषण करणार होते. मात्र, गांधी सप्ताह असल्यामुळे पोलिसांनी 10 तारखेपर्यंत त्यांना परवानगी नाकारली. 28 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रदीप यशवंत पूर्णेकर यांना कापूरबावडी पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 164 अंतर्गत ही नोटीस देण्यात आली असून, परिसरातील कायदा-सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी काही सूचना केल्या आहेत.

कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांनी ही नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होईल, शांतता भंग होईल किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा कृती टाळण्याचे निर्देश पूर्णेकर यांना देण्यात आले होते. तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबतही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. याच्याच दुसऱ्या दिवशी पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पूर्णेकर हे ठाकरे गटाशी संबंधित स्थानिक नेते असल्याने या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे का? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.

Shiv Sena (UBT) leader Pradeep Purnekar shot dead in Thane attack

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात