उद्या गरज पडल्यास कृषी कायदे पुन्हा आणले जातील : राज्यपाल कलराज मिश्रा


कृषी कायदे मागे घेण्यात आल्यानंतर राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी त्याचं समर्थन केलं होतं.तसेच मोदींच्या या निर्णयाची प्रशंसाही केली होती.Agriculture laws will be brought again tomorrow if need be: Governor Kalraj Mishra


विशेष प्रतिनिधी

जयपूर : गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहे. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन देखील मोदींनी केलं आहे.दरम्यान कृषी कायदे मागे घेण्यात आल्यानंतर राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्याचं समर्थन केलं होतं.तसेच मोदींच्या या निर्णयाची प्रशंसाही केली होती.

मिश्रा म्हणाले की, केंद्र सरकारने कृषी कायद्याबद्दल शेतकर्‍यांना समजवण्याचा प्रयत्न केला.परंतु हे तीनही कायदे मागे घेण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. सध्या हे कायदे केंद्र सरकारने मागे घेतले आहेत. परंतु उद्या जर गरज पडली तर हे कायदे पुन्हा आणले जातील असे मिश्रा म्हणाले.

Agriculture laws will be brought again tomorrow if need be: Governor Kalraj Mishra

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण