धनंजय मुंडेंवर यापुढे “करुणा” नाही, असे ऐकताच करुणा मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!


प्रतिनिधी

मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर देवेंद्रजींनी त्यावेळी प्रेम, दया, “करुणा” दाखविली. पण यापुढे तशी दाखवता येणे शक्य नाही, असे स्पष्ट उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्याबरोबर करुणा मुंडे विधिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचल्या. धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचा कायदेशीर आणि वैयक्तिक वाद सुरू असताना मूळातच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत “करुणा” या शब्दाचा उल्लेख करणे आणि त्यानंतर करुणा मुंडे यांनी एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ परिसरात येऊन भेट घेणे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळजनक चर्चा आहे. करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्याशी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत आणि या संघर्षाचा त्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ मिळते का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. After hearing that Dhananjay Munde has no more compassion Karuna Munde visits the Chief Minister

एकनाथ शिंदेंची फटाकेबाजी!!

तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, की धनंजय मुंडे परवा सभागृहाबाहेर बेंबीच्या देठापासून घोषणा देत होते. एवढ्या जोरात की, अनेक वर्षांपासून ते शिवसैनिक आहेत, अशी शंका यावी. त्यांचा सगळा राजकीय प्रवास आम्हाला माहिती आहे. एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर प्रेम, दया, “करुणा” दाखवली होती, पण पुनःपुन्हा तशी दया दाखवता येणार नाही, असे जोरदार फटाके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत वाजविले.

संयमी मितभाषी शिवसैनिक अशी ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांची विधानसभेच्या सभागृहातील जोरदार फटकेबाजी केली. ती ऐकून सारेच अवाक झाले. नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयकावरील चर्चेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, छगन भुजबळ यांनी मला एकदा विचारले होते, ‘काय बाबा कसं चाललंय ठीक आहे ना, ओके आहे ना?’ त्यावर मी त्यांना ‘सगळं एकदम ओक्के आहे’, असे सांगितले होते. त्यामुळे भुजबळ आणि अजित पवार यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या, असेही शिंदे यांनी सांगितले.

रिमोट कंट्रोल कुणाकडे, हे सर्वांना कळलंय

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतः भाजपचे ऐकू नये कारण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच सरकार चालवत आहे, असे शरसंधान राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांनी साधले होते. यात विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील आदी सदस्य आघाडीवर होते. या सगळ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरून उरले. त्यांनी विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर तुफान फटकेबाजी केली.

महाविकास आघाडीतील कारभारावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, कुणी कुणाच्या खांद्यावरून बंदूक चालवली, कोणाकडे रिमोट कंट्रोल होता, हे अजितदादांना सगळे माहिती आहे. ते (उद्धव ठाकरे) तुमचे ऐकत होते, म्हणूनच आमचे ऐकत नव्हते, असे शरसंधान शिंदे यांनी साधले.

पारदर्शकता येईल

नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडल्यास धनशक्ती, गुंड प्रवृत्ती बळावेल, असे विरोधी पक्षाचे सदस्य म्हणत आहेत. पण पैसेवाला किंवा गुंड एखाद्या विभागावर प्रभाव पाडू शकेल, संपूर्ण शहरावर असा प्रभाव पडणे शक्य नाही. नगराध्यक्षाला अधिकार देण्याबाबत तुमच्या सूचनांचा विचार आम्ही करू. मात्र, कारभारात पारदर्शकता आणायची असेल, तर लोकांमधून नगराध्यक्ष निवडून आणणेच योग्य होईल, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

After hearing that Dhananjay Munde has no more compassion Karuna Munde visits the Chief Minister

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात