कौटुंबिक न्यायालयात पत्नीचा दात पाडला


विशेष प्रतिनिधी

पुणे: कौटुंबिक न्यायालयात एक दाम्पत्य घटस्फोटासाठी आले होते. यावेळी पत्नीने घटस्फोटास नकार दिल्याने पतीने पत्नीला तोंडावर मारल्यामुळे तिचा दात पडला. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत सदर गृहस्थाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wife’s tooth decayed in family court by husband

या गृहस्थाचे नाव सचिन विकास पवार आहे. (वय ३४). रा.लोहगाव रोड. २७ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या समुपदेशन केंद्राच्या बाहेर सदर घटना घडली. सदर गृहस्थाची पत्नी सोलापूर येथे राहते. तिने याबाबत फिर्याद दिली आहे. हे दोघे पती-पत्नी असून दोघेही विभक्त राहत आहेत.


खोतकरांच्या गैरव्यवहारात विश्वास नांगरे-पाटील यांच्या कुटुंबियांचाही सहभाग, बायको- सासºयाने घेतला कारखाना विकत


घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर समुपदेशनासाठी दोघे कौटुंबिक न्यायालयात आले होते. यावेळी पतीने पत्नीला घटस्फोट देण्याविषयी सांगितले पण पत्नीने नकार दिला. याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर जोरात ठोसा मारला आणि फिर्यादीचा एक दात पडला. पत्नीचा खालचा अर्धा दात पाडून जखमी केल्याचा गुन्हा पतीवर दाखल झाला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.

Wife’s tooth decayed in family court by husband

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात