जमीनीवरील राजकारणी, वेदना सहन करत महिला खासदार सायकलवर जाऊन प्रसुतीसाठी झाल्या दाखल


विशेष प्रतिनिधी

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्य राजकारण्यांनी आपले पाय जमीनीवर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. येथील एक महिला खासदार ज्युली अ‍ॅनी जेंटर प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर आपल्या सायकलवर स्वार होत स्वत:च रुग्णालयात दाखल झाल्या. इथे त्यांनी तासाभरातच एका गोंडस आणि स्वस्थ बाळाला जन्म दिला.Politicians on the ground, women MPs suffering from pain, went on bicycles and admitted for delivery

ज्युली यांनी सोशल मीडियावर स्वत:च ज्युली यांनी आपल्या बाळाच्या जन्माची सुंदर बातमी शेअर केली. त्यांनी म्हटले आहे की, सकाळी ३.०४ मिनिटांनी आम्ही आमच्या कुटुंबातील एका नव्या सदस्याचं स्वागत केलंय. वास्तवत: प्रसुती वेदनेत सायकलवरून जाण्याची माझी कोणतीही योजना नव्हती. परंतु, असं घडून आले.



जेव्हा मी सकाळी २.०० वाजता रुग्णालयासाठी निघाले तेव्हा अधिक दबाव नव्हता. मला अधिक त्रासही होत नव्हता. परंतु, १० मिनिटांनंतर अचानक जोरात दुखू लागलं. आता मात्र माझ्या बाजुलाच एक स्वस्थ आणि आनंदी मुलगी पहुडलेली आहे, जसं तिचे वडीलही आहेत.

ज्युली अ‍ॅनी जेंटरल यांना ‘ग्रीन एमपी’ या नावानं ओळखलं जातं. पर्यावरणाविषयी आपल्या मोहिमांसाठी त्या अनेकदा चर्चेत असतात. ज्युली यांच्याकडे अमेरिका आणि न्यूझीलंड अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. त्यांचा जन्म मिनसोटामध्ये झाला होता. परंतु, २००६ सालापासून त्या न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाल्या. ज्युली यांनी २०१८ मध्येही अशाच पद्धतीनं सायकलवरूनच रुग्णालयात पोहचून आपल्या बाळाला जन्म दिला होता.

Politicians on the ground, women MPs suffering from pain, went on bicycles and admitted for delivery

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात