रांझना स्टार धनुष याला असुरण चित्रपटातील भूमिकेसाठी ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : रांझना स्टार धनुष याचा अतरंगी रे हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सारा अली खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत या चित्रपटामध्ये झळकणार आहे. 4 ऑक्टोबर 2019 रोजी धनुष याची प्रमुख भूमिका असणारा असूरण हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट वास्तविक जीवनातील 1967 साली घडलेल्या किलवेणमणी हत्याकांडापासून प्रेरित झालेला होता. या चित्रपटातील धनुषच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.

Ranjna star Dhanush wins Best Actor award at BRICS Film Festival for his role in Asuran

या उत्कृष्ट कलाकाराचे कौतुक आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झाले आहे. ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. असूरन या तामिळ चित्रपटाची त्याच्या दमदार अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते वित्रेमारन यांनी केले होते. आणि या चित्रपटात धनुषने डबल रोल साकारला होता.


Jai Bhim : अभिनेता सूर्यावर हल्ला करणाऱ्यास राजकीय पक्षाकडून एक लाखाचे इनाम जाहीर, अभिनेत्याच्या घराची सुरक्षा वाढवली


धनुषचे चाहते आता अतरंगी या सिनेमाची वाट पाहत आहेत. धनुषने रांझना या सिनेमात केलेले काम आजवरच्या डीप, इंटेन्स आणि रोमँटिक पिक्चर मधील सर्वोत्कृष्ट काम आहे असे म्हणता येईल. असुरन या चित्रपटात धनुषने शिवास्वामी नावाच्या शेतकर्यांची भूमिका साकारली होती. त्याच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मंजू वॉरियर ने साकारली होती.

असुरन, कर्णन अशा बर्याच समाजातील वास्तविकतेचे प्रदर्शन करणाऱ्या सिनेमांमध्ये काम करून या मेनस्ट्रीम अॅक्टरने एक नवा आदर्श कलाकारांसमोर घालून दिला आहे.

Ranjna star Dhanush wins Best Actor award at BRICS Film Festival for his role in Asuran

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात