विरोधक आणि माध्यमे काळे चित्र दाखवायला उतावळे; परकीय गुंतवणुकीत मात्र महाराष्ट्र नंबर 1 ने उजळे!!


महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत नंबर 1; फडणवीस बोलले आकड्यांत!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विरोधक आणि माध्यमे महाराष्ट्राचे काळे चित्र दाखवायला उतावळे, पण परकीय गुंतवणुकीत मात्र महाराष्ट्र नंबर 1 ने उजळे, असे घडले आहे!! Though opposition and media paints maharashtra politics in black, shinde fadnavis government brings in FDI on the top!!

महाराष्ट्रात जे काही घडवतात ते फक्त शरद पवार घडवतात, असे चित्र गेली अडीच – तीन वर्षे मराठी माध्यमे रंगवत आहेत. परंतु गेल्या 13 महिन्यांमध्ये मात्र बदललेले चित्र आणि आकडे मात्र काही वेगळेच सांगत आहेत. ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आले आणि त्याला अजित पवारांची राजकीय स्टेपनी जोडली, तरी देखील महाराष्ट्राचे नकारात्मक चित्र रंगवण्यात माध्यमे आजही आघाडीवर आहेत. काँग्रेस सह बाकीच्या विरोधकांना माध्यमांचाच बुस्टर डोस मिळाल्याने विरोधी पक्षही तेच नकारात्मक चित्र अधिक काळे करून सांगत आहेत, पण प्रत्यक्षात परकीय गुंतवणुकीचे आकडे सकारात्मक वस्तुस्थिती दाखवत आहेत.

महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात परकीय गुंतवणुकीत गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू पेक्षा पिछाडीवर गेलेला महाराष्ट्र 2022 – 23 च्या आर्थिक वर्षात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे, इतकेच नाही तर 2023 – 24 च्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत देखील पहिल्या क्रमांकावरच राहिला आहे. या संदर्भातली आकडेवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी या संदर्भात पोस्ट लिहिली आहे.

ती अशी :

  • 2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे.
  • *डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ₹36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.
    दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे.*
  • मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरू आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मनापासून अभिनंदन!!
  • याचा अर्थ विकसित देशातल्या बड्या आणि मध्यम गुंतवणूकदारांना भारतातले महाराष्ट्र हेच राज्य सुरक्षित आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वाटत आहे. मात्र या सकारात्मक चित्राकडे विरोधकांनी दुर्लक्ष करणे स्वाभाविक मानता येईल. पण माध्यमांनीही त्याकडे दुर्लक्ष करणे हे मात्र निश्चितच अस्वाभाविक आहे. त्याची कारणे त्यांच्या “विशिष्ट बुद्धीत” दडली आहेत.

Though opposition and media paints maharashtra politics in black, shinde fadnavis government brings in FDI on the top!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात