उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शेतकरी मेळाव्याकडे सोमेश्वर च्या सभासदांचे लक्ष

Someshwar

विशेष प्रतिनिधी

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या राजकीय वर्तुळात हालचालींना आता वेग आला आहे. होळ (ता. बारामती ) येथे शनिवारी (ता. ५) उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा मेळावा पार पडत आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी करंजे (ता. बारामती) येथील श्री क्षेत्र सोमेश्वर महादेव मंदिराला भेट देत मनोभावे दर्शन घेतले. Someshwar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती दौऱ्यावर आल्या होत्या. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नजीक आल्याने त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील एक मताने निर्णय झाला नाही, तर निवडणूक नक्की लढवू असे विधान केले होते.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका मांडतात याकडे कारखाना कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी मंदिरात पोहोचल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वर महादेवाची मनोभावे पूजा केली. त्यानंतर आरतीमध्ये सहभागी होत देवाचा आशीर्वाद घेतला. यावेळी मंदिर परिसरात भाविकांचीही उपस्थिती होती.

शेतकरी मेळाव्यातून काय संदेश?

दर्शनानंतर सुनेत्रा पवार होळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी रवाना झाल्या. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी शेतकरी आणि सभासदांशी संवाद साधण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.

बारामती परिसरातील राजकीय घडामोडी आणि सोमेश्वर कारखाना निवडणुकीची तयारी यामुळे सुनेत्रा पवार यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सोमेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहून शेतकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत .

Someshwar members’ attention focused on Deputy Chief Minister Sunetra Pawar’s farmers’ rally.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात